चिरागचे फोनकडे लक्ष गेले..
त्याने गेम थांबवला..
आणि फोन रिसिव्ह केला..
दिवसभरात काय काय केले हे सर्व तो हेमंतला उत्साहाने सांगत होता..
समीर क्लासरूमच्या दारापाशी उभा होता..
समीर आणि मी दोघे एकमेकांकडे हताशपणे बघत होतो..
बापलेकांच्या गप्पा रंगात आल्या होत्या..
उत्साहाच्या भरात चिरागने चुकूनसुध्दा त्याच्या नवीन फ्रेन्डचे म्हणजे समीरचे नाव बाबा जवळ घेऊ नये म्हणून मी ईश्वराचा धावा करत होते..
आणि तो क्षण आलाच..
बोलता बोलता हेमंतने चिरागला विचारले की मम्मा कुठे दिसत नाहीये तुझी..
तेव्हा चिरागने मागे वळून पाहिले..
आणि हेमंतला सांगितले की मम्म्मा बिझी आहे..
हे ऐकून हेमंतने भुवयाच उंचावल्या असणार..
कारण आत्ता कुठे बिझी आहे ती? कोणी आलंय का?..
हा पुढचा प्रश्न त्याने लगेच विचारला..
आता मला भोवळ यायचीच बाकी होती..
पण..
चिरागने असे सांगितले की, तिचे खूप पेपर्स तपासायचे बाकी आहेत ना रे बाबा..
क्लासरूममध्ये तपासत बसलीये ती पेपर्स..
तू आत्ता तिला डिस्टर्ब नको करू..
तिचं झालं की मी सांगेन तिला तुला कॉल करायला..
हेमंत यावर सहमत झाला..
आणि त्याचा टी ब्रेक ही संपला होता..
त्यामुळे त्याने चिरागला बाय करून कॉल कट केला..
चिरागच्या समयसूचकतेमुळे आज माझी चोरी पकडली गेली नव्हती..
मला धावत जाऊन चिरागला मिठीच मारावीशी वाटत होती..
माझ्या देहबोलीतून समीरला ते समजले..
पण समीरने मान हलवत खुणावले, "नो"..
कारण उगाचच मला असे ओव्हररिॲक्ट झालेले बघून कदाचित चिरागला वेगळेच वाटले असते..
मी भिंतीवर लावलेल्या बाप्पाच्या तसबिरीच्या पाया पडले..
आणि सावकाश चिरागकडे गेले..
काय रे बब्बुडी..
माझे काम तर पूर्ण झाले होते तरी का बोललास तू बाबाला की मी काम करतेय?..
असे मी लाडाने विचारताच त्याने उत्तर दिले की,
मम्मा, तू आधीच किती थकली आहेस..
बाबाशी बोलून अजून थकणार..
म्हणून मी बोललो..
किती हुशार आणि समंजस झालाय माझा बाळ!..
मम्माची इतकी काळजी?..
असे म्हणत त्याला कुरवाळत मी त्याची पप्पी घेतली..
समीर ही सगळी गंमत बघत गालातल्या गालात हसत होता..
मी न राहवून चिरागला विचारले की, तू तुझ्या न्यू बडीची ओळख नाही करून दिलीस बाबाला?..
तेव्हा त्याने जे उत्तर दिले ते ऐकून समीरलाच खूप हसायला आले..
चिराग म्हणाला..
मम्मा यू ऑलरेडी नो..
बाबाला जर मी सांगितले की, हा न्यू बडी समीर मला आयपॅड मध्ये छान छान गेम देणार आहे तर बाबा त्या बिचाऱ्याला रागवला नसता का?..
मलाही त्याच्या निरागस मनाचे हसू आले आणि कौतुकही वाटले..
समीर सोफ्याजवळ आला..
आणि हात पुढे करत चिरागला म्हणाला की आजपासून आपली तिघांची टीम..
चिरागने त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला मम्मा तू पण..
मी ही त्यांच्या हातावर हात ठेवला..
माझ्या मनात एक दुष्टचक्र सुरू झाले..
हेमंतने पुन्हा कधीच परत येऊ नये..
आणि समीर, चिराग, मी असाच त्रिकोण असावा..
असा कुविचार तेव्हा नकळत मनाला शिऊन गेला..
YOU ARE READING
आसक्त
Romanceमी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वया...