7.6K 14 2
                                    

आणि मला खूप अपराध्यासारखे वाटायला लागले.. कारण मी समीरला पार विसरून गेले होते..
त्याच्याशी बोलता बोलता मधूनच निघून गेले होते आणि त्याचे कितीतरी मेसेजेस येऊन धडकले होते..
ते वाचल्यावर मी सर्वात आधी त्याला सॉरी म्हणाले..
खरे तर सॉरी म्हणायची गरज नव्हती मला..
कारण समीर माझा कोणीही लागत नव्हता की ज्यासाठी मी त्याचे इतके मन सांभाळावे..
फक्त एवढेच की क्लासमध्ये असेपर्यंत तो माझा आवडता विद्यार्थी होता..
अभ्यासू, प्रामाणिक आणि परिस्थितीची जाणीव असणारा होता म्हणून मी त्याच्याशी खूप आपुलकीने बोलायचे..
सर्व बॅचलाही माहित होते की समीर टीचरचा फेवरेट स्टुडंट आहे..

माझे मन सारखे भूतकाळात जात होतं..
पुन्हा त्याचा मेसेज आला..
सॉरी नका म्हणू..
इट्स ओके..
आणि मग त्याच्या दहावीच्या बॅचच्याच जुन्या आठवणी त्याच्यासोबत बोलताना पुन्हा एकदा ताज्या झाल्या..
बोलता बोलता तोही म्हणाला, काय हो मॅम, मी तुम्हाला खूप आवडायचो ना?..
मी मनातल्या मनात हसत त्याला हो असे उत्तर दिले.. लगेच पुढे म्हणतो कसा..
मला पण तुम्ही खूप आवडायच्या..
इन्फॅक्ट अजूनही आवडता खूप..
तुमचा प्रोफाइल पण किती सुंदर आहे..
माईंडब्लोईंग..
त्याचे ते शब्द ऐकून छातीत एकदम धस्स झाले..
अरे काय बोलतोय हा पोरगा..
असे कोणी बोलते का टीचर सोबत?..
मी काही टाईप करण्याआधीच त्याचा पुन्हा एक मेसेज आला..
मॅम, तुम्ही माझ्या क्रश आहात..
आता हा माझ्यासाठी मोठा धक्काच होता..
मी डोळ्याच्या कोपऱ्यातून घाबरत हेमंतकडे पाहिले..
तो त्याच्या कामात मग्न होता..
इकडे समीर मला विचारत होता..
मॅम, अहो मॅम, चिडल्या का तुम्ही माझ्यावर?..
सॉरी हां..
प्लीज चिडू नका हो..
कारण मी जे बोललो ते अगदी खरंय..
मला तुम्ही खूप आवडता..
परत तेच तेच वाचून माझा खूप संताप व्हायला लागला होता..
पण त्याला रागवायची माझी इच्छाच नव्हती होत..
मी कोणालातरी आवडते हे वाक्य मला खूप सुखावणारे होते..
आणि त्यामुळे ते वाक्य कोण बोलतयं याकडे मी जाणूनबुजून दुर्लक्ष केले..

 आसक्त Where stories live. Discover now