४७

3.8K 21 63
                                    

हेमंत यू एस ला गेल्यानंतर साधारण एक महिन्यानंतर..

हेमंत: गुड इवनींग बेटा..
असा रुसला का आहे माझा बाळ?..

चिराग:( गाल फुगवून..)
गुड मॉर्निंग बाबा..

हेमंत: काय चाललंय माझ्या बाळाचं?..

(चिराग शांतच..)

मी: अरे..
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मामाकडे इतकी मस्ती आणि धमाल केली..
आणि आता इथे आल्यानंतर दोन दिवसांपासून सतत हॉलिडे होम वर्क करून करून कंटाळली आहे स्वारी..
त्यात अजून उद्यापासून स्कूल सुरू होतेय..
मग अजूनच जास्त राग येतोय साहेबांना..

हेमंत: हाहाहा..
बरोबर आहे..
यावर्षी पहिल्यांदाच एवढे दिवस राहिलीस ना आईकडे..
आणि आता कायमच राहायला मिळेल..
फक्त यावर्षीच्या बॅचेस तू उरकून टाक..
पुढल्या वर्षीपासून हे सर्व उद्योग बंद करायचे..
तुझा नवरा आता खूप कमवतोय..
तुला आता कष्ट करायची गरज नाही..
तू महाराणी बनून रहा..
मस्त आराम कर..

(आम्ही दोघे बोलत असल्याने चिराग पार्किंग मध्ये सायकल खेळायला निघून गेला..)

मी: (लाजत लाजत..)
तू कुठे करू दिलाय आराम?..
माझ्या मागे त्रास लावून गेलास जाताजाता..

हेमंत: हो..
चिराग, घरातलं काम, तुझ्या बॅचेस आणि बाहेरची सगळी कामं..
खूप जबाबदाऱ्या तुझ्या एकटीवर टाकून गेलोय ना मी..
पण तू विवेकदादा किंवा ऋषीची मदत घेत जा काही अडचण आलीच तर..

मी: अरे, मी त्या त्रासाबद्दल बोलतच नाहीये..

हेमंत: मग काय राहिले बोलायचे?..

मी: (पुन्हा लाडात येऊन..) गेस कर ना तू..

हेमंत: अगं, ऑफिससाठी रेडी होतोय मी आणि तू काय असं खेळतेय माझ्यासोबत लहान मुलांसारखे..
बोल लवकर..

मी: काल डॉक्टरकडे गेले होते मी..
माझी पिरियडची डेट मिस झाली म्हणून..

हेमंत: वेट वेट वेट..
(आनंदाने डोळे विस्फारत..)
मी पुन्हा एकदा बाबा होणार?..

मी: ( खुदकन हसत..)
हो..
तू पुन्हा एकदा बाबा होणार..

हेमंत: जयू..
आय एम सो हॅपी..
आय लव्ह यू..

 आसक्त Where stories live. Discover now