५९

1.1K 9 1
                                    

समीरने विजयासाठी कारचा दरवाजा उघडला..

"या राणीसरकार.. बसा.."

या त्याच्या वाक्याने विजया सुखावली..
तो ड्रायव्हिंग सीट वर येऊन बसेपर्यंत त्याला एक कॉल आला..
विजयाने पाहिले की त्याने तो कॉल रिजेक्ट केला..

समीर आणि जया दोघेही शांतपणे निसर्गाचा आनंद घेत गप्पा मारत पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेकडे निघाले होते..

समीर तिला कॉलेजच्या प्रोफेसर्सच्या आणि मित्रांच्या गमतीजमती ऐकवत होता..
विजया निखळ हसून त्याच्या त्या किस्स्यांना प्रतिसाद देत होती..
किती खुश होते दोघे जण..
पण विजया मधूनच काहीतरी विचार करून गंभीर होत होती..

इतकी आनंदी ती कधीच नव्हती..
या आनंदाला कोणाची दृष्ट नको लागायला..
असे विचार उगीच तिच्या मनात सारखे सारखे डोकावत होते..

लाँग ड्राईव्ह वरून परत येताना घराजवळच कुठल्या तरी चांगल्या हॉटेलात डिनर करायचा असा त्यांचा प्लॅन आधीच ठरला होता..
त्यानुसार एका हॉटेलसमोर समीरने कार थांबवली..

विजया मेनू बघण्यात गर्क होती..

"इनामदार मॅडम तुम्ही?.." असे वाक्य तिच्या कानावर पडले..
त्या वाक्याने विजया दचकली..
तिने मान वर केली..
आणि "त्या" चेहऱ्याकडे ती साश्चर्य भावनेने बघू लागली..

मी यायचो ना तुमच्याकडे क्लासला..
तुमची स्वयंपाकीण कुंदा खैरनार?..
तिचा मी भाचा..
तुम्हाला मी कधीच विसरू शकणार नाही "इनामदार मॅडम"..
मला आजही तुम्ही माझ्यावर केलेले उपकार आठवतात..
माझ्या घरच्या परिस्थितीमुळे तुम्ही माझ्याकडून कधीच फी घेतली नव्हती..
उलट मला कायमच मदत केली आणि शिकायला प्रोत्साहन दिले..
तुमच्यामुळेच तर आज मी यशस्वी बनलोय..
आय टी सोल्यूशन्सचा एक नवा स्टार्टअप सुरू केलाय..
मॅम तुम्ही नसत्या...... तर.. माझे वडील माझी शाळा बंद करून मला भाजीचा गाडा चालवायला लावणार होते..
मला अजूनही आठवते तुम्ही त्यांना किती जीव तोडून समजावले होते..
बरं ते सर्व जाऊदे..
तुम्ही कशा आहात?..
सर कसे आहेत?..
तुमचा चिराग पण आता खूप मोठा झाला असेल ना?..
ते दोघे?..

 आसक्त Where stories live. Discover now