पण आमच्याकडे शिशुवृंदाचे वर्ग नाही चालवले जात ना..
मी असे म्हणताच ऋषी आणि मी एकमेकांच्या हातावर टाळी देऊन हसू लागलो..
ऋषी अचानक उठला..
मी: अरे अरे, काय झाले.. आय वॉज किडिंग..
ऋषी: अगं, आलोच.. आईने आणि बायकोने तुझ्यासाठी स्पेशल काहीतरी पाठवलंय.. तुला भेटण्याच्या उत्साहात ते मी कारमध्येच विसरलो.. मी आसावरीला म्हणजे माझ्या बायकोला तुझ्याबद्दल इतकं काही सांगितलेय की तिलासुद्धा यायचे होते तुला भेटायला.. पण तिच्या मैत्रिणींसोबत आज ती फिनिक्स मॉलला चालली आहे सो आज शक्य नव्हते तिला..
मी एका मिनिटात आलोच हां..बोलत बोलत ऋषी बाहेर गेला..
मी देखील त्याच्यामागे दाराकडे गेले..
त्याने कारचा दरवाजा उघडला..
बी एम डब्ल्यू ची टॉप मॉडेलची कोरी करकरीत कार बघून माझे डोळेच दिपले..ऋषी हसत हसत पुन्हा आत आला..
स्टीलचे दोन डबे माझ्या हातात देत म्हणाला..
तुझ्या फेवरेट खरवसच्या वड्या..
आईने खास तुझ्यासाठीच बनवल्या..
आणि आसावरीने पाठवले तुला आवडणारे राय आवळ्याचे लोणचे..मी: ए ऋषी.. नको रडवू रे.. अजूनही सर्व लक्षात आहे तुझ्या?
ऋषी: अगं वेडे, माझ्या अस्तित्वाचा एक भाग आहेस तू.. तुला विसरणे म्हणजे स्वतःला विसरणे..
मी: नको रे सेंटी करुस.. (डबे किचन मध्ये नेत..) तुझ्यासाठी चहा बनवू की कॉफी?..
ऋषी:( माझ्यामागे किचन मध्ये येत..) काहीच नको गं मला.. तु भेटलीस तेव्हाच सगळं मिळालं मला..
मी: जाड्या, फ्लर्ट करण्याचा एक चान्स नाही सोडत हां तू..
ऋषी: हाहाहा.. अगं जयू.. काय सांगू तुला.. मी घरी आलो की, आई आणि बायको दोघी इतकं खाऊ घालतात मला की विचारू नकोस.. का तर म्हणे जहाजावर मला घरचे जेवण मिळत नाही.. आत्ता पण पोट फुटेपर्यंत नाश्ता करून आलोय मी.. पण कॉफी कर.. तुझी खूपच इच्छा असेल तर..
मी: (खरवस वडीचा तुकडा खात).. अम्म्म.. वाह.. लाजवाब..
कित्ती दिवसांनी आस्वाद घेतला.. नाहीतर फक्त माहेरी गेले तर खायला मिळतात.. हेमंत आणि चिरागला आवडतं नाही.. मग मीही बनवत नाही..
YOU ARE READING
आसक्त
Romanceमी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वया...