डोक्यावरुन प्रेमाने फिरणाऱ्या उबदार हाताच्या स्पर्शाने विजयाला जाग आली..
अर्धवट डोळे उघडत, सोफ्यावर उठून बसत असताना ती झोपेतच बरळली..
राहुल..
आलास तू?..
मला तुझी..आणि अचानक तिने जीभ चावली..
समीर..
तू..
तू..
.
.
.
तू आलास?..समीर तिच्याकडे प्रेमाने बघत होता..
ती मात्र अपराध्यासारखी मान खाली घालून त्याच्यापासून नजर लपवत होती..
समीरला तिच्या मनातली चलबिचल जाणवली..
तिला कंफर्टेबल वाटावे म्हणून त्याने लगेच विषय बदलला..सॉरी स्वीट हार्ट...
तुझे मिसकॉल्सचे नोटिफिकेशन्स मला मिळाले पण कॉल करण्याची सिच्यूएशनच नव्हती गं..
मी तुला सरप्राईज देणार होतो म्हणून खोटं बोललो होतो की मी कॉलेजला चाललोय..हे घे तोंड गोड कर..
असे म्हणत समीरने विजयाची आवडती काजूकतली तिच्या तोंडात कोंबली..
विजया:
अरे पण बोल तरी स्पष्ट..
काय झाले?..
कुठे होतास तू?..काजूकतलीचा एक तुकडा तोडून उरलेला समीरला भरवत ती म्हणाली..
समीर:
मेरी जान..
यू डोन्ट नो..
तू आणि आपले हे बेबी किती लकी आहेत माझ्यासाठी!..विजया:
अरे पण असे झाले तरी काय?..
सांग ना लवकर..समीर:
अगं माऊ..
आज माझे ॲग्रीमेंट फायनली साईन झाले..
आपली लाईफ आता सेट आहे जानेमन..
तू माझी गूड लक चार्म आहेस यार..
आय लव्ह यू..असे म्हणत समीरने जयूचा गालगुच्चा घेतला..
समीर खूप खूष होता..
त्याच्या मेहनतीचे चीज झाले होते..
पण आज का कोणास ठावूक विजया फारशी खुश नव्हती..
हेमंतने तिला यू.एस. ला जॉबसाठी जाण्याची न्युज दिली होती तो दिवस तिला आठवला..विजयाने चेहऱ्यावर उसने हसू आणले..
समूच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला फोरहेड किस दिले..आय एम सो हॅपी फॉर यू..
समीर:
बस तू अशीच प्रेम करत रहा माझ्यावर..
तुझा समीर जगातली सगळी सुखे तुझ्या पदरात आणून टाकणार आहे..
YOU ARE READING
आसक्त
Romanceमी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वया...