समीरला मी स्वतः पासून दूर करायचे ठरवले होते..
खरेतर मला त्याची इतकी सवय झाली होती की झोपेत सुध्दा मी त्याला मिस करायचे..
त्याच्याशी नुसते सेक्सटिंग केले तरी मी वेट व्हायचे..
त्याचा सहवास मला कायम हवाहवासा वाटायचा..
मला त्याच्याशी लग्न बिग्न करण्यात रस नव्हता..
त्याचे माझ्या आयुष्यात असणेही मला पुरेसे होते..
पण तो जर माझ्याव्यतिरिक्त इतर मुलींमध्येही गुंतत असेल तर अशा लफडेबाज व्यक्तीला माझ्या आयुष्यात कोणतेच स्थान नव्हते..
मी त्याच्यावर खरे प्रेम करत होते..
जेव्हा हेमंत फक्त नावालाच माझा नवरा म्हणून उरला होता तेव्हा समीरनेच मला भावनिक आणि मानसिक आधार दिला होता..
पण त्यामागे त्याचा स्वार्थ होता हे कटू सत्य आता समोर आले होते..
शारीरिक जवळीक वाढली तर दोन व्यक्ती एकमेकांच्या भावना अजून जास्त समजून घेतात या विश्वासाने मी समीरला सर्व अधिकार दिले..
त्याच्याशी शारीरिक संबंध बनवले..
हे सर्व करून हेमंतचा इतक्या वर्षांचा माझ्यावर असलेला विश्वास मी चकणाचुर केला होता..
कारण मला समीर माझ्या खूप जवळचा वाटतं होता..
समीरसाठी वाट्टेल ते करण्याची माझी तयारी होती..
त्याच्या येण्याने माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा बहार आली होती..
पण समीरला माझ्या प्रेमाची कदर नव्हती..
माझे प्रेम आणि माझ्या भावना त्याच्यासाठी कवडीमोल होत्या..
त्याचे माझ्यावर प्रेम कमी आणि शारीरिक लगट जास्त होती..
हे सत्य खूप बोचणारे होते..
मला त्याच्याशी भांडायचे नव्हते..
कोणतेच वाद घालायचे नव्हते..
मी शांतपणे त्याच्या आयुष्यातून निघून जाणार होते..मी ठरवल्याप्रमाणे त्याच रात्री, झोपण्यापूर्वी त्याला सगळीकडे ब्लॉक केले..
जिथे जिथे तो मला कॉन्टॅक्ट करेल अशी शंका आली ते सर्व मार्ग मी बंद करून टाकले..
व्हॉट्सॲपवरही ब्लॉक करून तिथे आलेले त्याचे टेक्स्ट सीन आणि डिलीट केले..
मी त्याला कॉल केला नव्हता म्हणून त्याची नाराजी त्याने त्या टेक्स्टमधून दाखवली होती..त्या रात्री ऋषीकेशचे टेक्स्ट पण मी इग्नोर केले..
केवळ हेमंतला व्हॉईस मेसेज पाठवला..
कारण कोणाशी छान बोलण्याची माझी मानसिकताच नव्हती..
YOU ARE READING
आसक्त
Romanceमी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वया...