५८

1.9K 11 5
                                    

विजयाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली..
तिचे पायच उचलेनात..
ती दाराकडे बघत ढिम्मपणे उभी होती..

पुन्हा एकदा डोअर बेल वाजली..
आणि तिचे हृदय वेगाने धडधडू लागले...
तिला थंडगार घाम फुटला..

अगं वेडे उभी काय आहेस नुसती..
दार उघड ना..

समीरच्या या बोलण्याने ती दचकली..
अर्धवट घातलेले शर्ट नीट करत, पुढे जाऊन समीरने दार उघडले..

विजयाने समीरच्या आडून पाहिले..
दारात एक अनोळखी माणूस उभा होता..
त्याने समीरच्या हातात एक पुडके दिले आणि तो लगेच निघून गेला..
विजयाचा जीव भांड्यात पडला..

समीर तिच्याकडे बघून हसून म्हणाला..
बरे झाले तू नाही दार उघडलेस..
नाहीतर हा गोपाळ चूकीच्या घरी आलोय असे समजून निघून गेला असता..

विजया:
गोपाळ?..
समू हा गोपाळ कोण आहे?..

समीर:
अगं तो इस्टेट एजंट आहे..
पप्पांनी एक जमीन घेतली होती बावधन शिवारामध्ये..
रिकामीच पडली होती..
सध्या गोडावूनसाठी रेंट वर देऊन टाकली..
दरमहा पन्नास हजार रेंट मिळणार आहे..
दहा लाख डीपॉझिट..
त्यातले आज हे पाच लाख आले..

विजया:
पण एवढा मोठा व्यवहार तू भाऊ आणि वडिलांना न विचारता तर नाही केलास ना?..

समीर:
नाही गं बाळा..
माहितेय त्यांना..
त्यांची परवानगी घेऊनच सगळे व्यवहार केलेत..
डोन्ट वरी..
आणि तू किती लकी आहेस ठाकूर परिवारासाठी बघ..
तू घरात आलीस आणि लगेच इतके मस्त डील फायनल झाले..
नाहीतर खूप कमी रेंट देणारेच कस्टमर येत होते..
खरंच,  लक्ष्मी की काय बोलतात ना तीच आहेस तू..
आमची गृहलक्ष्मी..
विजयालक्ष्मी..
हाहाहा..

विजया:
बरं बरं नको उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू..
संध्याकाळी काय जेवायला बनवू सांग..

समीर:
नो नो नो..
घरी काही बनवायचे नाहीये..
आज डिनर बाहेरच करूया..
तुझा मूड पण आता छान आहे..

विजया:
पण मला पुन्हा आवरायचा कंटाळा आलाय रे समू..

समीर:
तुला आवरायची काहीच गरज नाही..
तू मुळात सुंदर आहेस..
सकाळी मॉल मध्ये पाहिलेस ना, लोक आपल्याकडे असे  बघत होते ॲज इफ वी आर न्यूली मॅरीड कपल..

 आसक्त Where stories live. Discover now