४२

2.6K 9 8
                                    

प्रमीलाची बडबड ऐकून मनात येऊ नये ते वाईट विचार यायला लागले..
मी मन दुसरीकडे वळवायचा प्रयत्न केला..
शेवटी मी न राहवून समीरला फोन लावला..
मनाची खात्री पटण्यासाठी..
त्याने फोन उचलला नाही..
मी पुन्हा कॉल केला..
पूर्ण रिंग वाजली..
नो रिस्पॉन्स..
माझे मन आता अजूनच अस्वस्थ झाले..
मी तिसऱ्यांदा कॉल केला..
कॉल रिसिव्ह झाला..

मी: हां समीर.. कुठे आहेस तू?.. कॉल का घेतले नाहीस?.. मला किती टेंशन आलेलं माहितेय?..

पलीकडून: हॅलो.. मी समीर नाही.. बाय द वे आपण कोण?..

मी: ओह.. मी विजया.. तुम्ही कोण?.. समीर कुठे आहे?..

पलीकडून: मी समीरचा मित्र राहुल.. समीर इथे नाहीये..
त्याचा फोन माझ्याजवळ आहे..

(आता तर माझी खात्रीच पटली होती की नक्कीच समीरला काहीतरी झाले असणार..)

मी: पण मग स.. स्समीर आहे कुठे?.. इज ही ऑल राईट?..

राहूल: समीर इथेच आहे पण मी त्याला फोन देऊ शकत नाही..

मी: ( न राहवून, राहुलचे बोलणे ब्रेक करून.. पॅनिक होऊन..) क क का?..

राहूल: समीर ब्लड डोनेट करायला आलाय.. गेल्या तीन वर्षांपासून तो त्याच्या बर्थडेला ब्लड डोनेशन करतो.. आज त्याचा बर्थडे आहे ना..

मी: ओके.. त्याला सांग की फ्री झाल्यावर मला कॉल कर लगेच..

राहूल: हो, सांगतो सांगतो..

शीट..
मी समीरचा वाढदिवस कसा विसरून गेले?..

केव्हातरी वयाचा विषय निघाला..
तेव्हाच त्याने मला सांगितले होते..
२८ सप्टेंबर १९९९ ही त्याची जन्मतारीख..
समीर माझ्यापेक्षा तब्बल चौदा वर्षांनी लहान होता..
आज त्याला एकविसावे लागले होते..

मी जेव्हा पण माझ्या वयाबद्दल बोलायचे तेव्हा Age is just a number हा त्याचा ठरलेला डायलॉग असायचा..
"तू माझी मलाईका अरोरा आणि मी तुझा अर्जुन कपूर"
या त्याच्या वाक्यावर मी खूप हसले होते..
आणि त्याच गमतीजमती मध्ये मी त्याचा बर्थडे नोट करायचा विसरले होते..

 आसक्त Dove le storie prendono vita. Scoprilo ora