सकाळी मला अलार्मच्या आवाजाने जाग आली..
मी अलार्म बंद केला..सम्या ऊठ, सम्या ऊठ ना..
असे म्हणत मी झोपेतच त्याला हलवून जागे करत होते..
मम्मा, मी नंतर उठतो ना..
तूच ऊठ आता..
हे शब्द ऐकताच माझे खाडकन डोळे उघडले..
चिराग उठून बसला होता..
आणि डोळे चोळत संभ्रमित होऊन माझ्याकडे बघत होता..बच्चू शॉली..
झोप झोप तू..
असे बोलत मी चिरागला थापटत झोपवले..
पाचचा अलार्म बंद करून समीर निघून गेला होता..
चिरागच्या पाठीवरून, डोक्यावरून हात फिरवताना मी आधी माझे व्हॉट्सॲप मेसेजेस चेक केले..समीरचाच मेसेज सर्वात वर होता..
गुड मॉर्निंग ब्युटीफुल..
अहाहा..
झोपेत तुझे सौदर्य अजूनच खुलून दिसते गं मदनिके..
जणू स्वारगेटची अप्सरा..
सॉरी सॉरी..
टायपो झाला..
हाहाहा..
स्वर्गातली अप्सरा*..
अगं माऊ, तू खूप गाढ झोपलेलीस..
तुझी झोपमोड होऊ नये म्हणून मी अलार्म लगेच बंद केला..
आणि बिलकुल आवाज न करता निघून गेलो..
आणि ऐक ना..
आज मला यायला नाही जमणार..
ओके?..
मिस मी हां..
हाहाहा..समीरचे सर्व मेसेजेस वाचून त्याला काहीही रिप्लाय न करता मी फोन बेडवर आपटला..
आणि झटपट माझे आवरले..
नंतर नाश्ता करतेवेळी मी समीरला फोन लावला..
आज चक्क कॉलरट्यून ऐकू येत होती..
मेरी रुह का परिंदा फडफडाये..
ती ऐकून मला ऐश आणि रणबीर मधला इंटीमेट सीन आठवू लागला..
पण मला सकाळी सकाळी माझी गाडी रुळावरून घसरू द्यायची नव्हती..
समीरने बराच वेळ मला ती कॉलरट्यून ऐकू दिली..
आणि कॉल उचलला..समीर: बोल बेबी..
मी: चिराग विचारतोय की तू आज येणार का नाहीस?
(खरं तर हे मीच त्याला विचारले होते..)
समीर: अगं जान..काय झाले माहितेय का.. माझी ती इंस्टाग्राम वरची बुलबुल आहे ना..
मी: शलाका देशमुख?..
समीर: येस्स.. तिच..
अगं ती कधीपासून गळ्यात पडलीये..
समीर भेट ना एकदा..
भेट ना एकदा..
सारखं मागे लागलीये..
मी: मग आज तू तुला भेटणार आहेस का?..
समीर: हो गं राणी..
ती बुलबुल कधीपासून फडफड करतेय आज तिला शांत करूनच टाकतो..
मी: असं कोड्यात काय बोलतोय?..
शांत करतो म्हणजे?..
काय करणारेस तू?..
समीर: अगं, असे पण माझी फॅमिली सध्या नाहीये..
घरी मी एकटाच आहे..
आज कॉलेज बंक करतोय आणि शलाकाला घरी बोलवतोय..
मी: घरी कशाला?..
शेजारी रागवणार नाहीत का?..
त्यांना काय वाटेल?..
(माझी मुळीच इच्छा नव्हती की शलाकाने समीरच्या घरी यावे म्हणून मी समीरला मुद्दाम शेजाऱ्यापाजाऱ्यांचा धाक दाखवत होते.)
समीर: चिल्ल रे..
अरे, माझे फ्रेण्ड्स कायम जात येत असतात..
कोणाला डाऊट नाही येणार..
आणि असेही कोणी रिकामे नसते..
सगळे शेजारी आपापल्या कामात मग्न असतात..
YOU ARE READING
आसक्त
Romanceमी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वया...