६२

726 6 10
                                    

समीरने जयूला बेडवर बसवले..
स्वतः तिच्या जवळ बसत, तिचा हात हातात घेत समीर म्हणाला..

हे बघ जयू..
आई आणि तू, तुम्ही दोघी माझ्या लाईफमध्ये खूप महत्वाच्या आहात..
कुणाही एकीला निवडणे खूप अवघड आहे माझ्यासाठी..
आणि तुमच्या इतकीच अजून एक व्यक्ती खूप महत्वाची आहे माझ्यासाठी..

विजया:
आणि कोण आता?

विजयाने भुवया उंचावत विचारले.

समीर:
आपलं बेबी रे..

असे म्हणत समीरने जयूच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवला..

आणि बाळा..
तू आता खूप विचार नको करत जाऊस..
फक्त स्वतःची काळजी घे..
विसरू नकोस की तू विजयालक्ष्मी आहेस..
स्ट्राँग लेडी..
जास्त इमोशनल नको होत जाऊ तू..

विजया:
स्ट्राँग लेडी होते मी कधी काळी..
पण आता खूप सेन्सिटिव्ह झालेय मी..
मला कोणा ना कोणाच्यातरी आधाराची गरज आहे..
भीती वाटते की, एकटी कशी जगेन मी?..
प्रॉमिस मी समू, तू मला कधीच सोडून नाही जाणार..

असे बोलून विजयाने समीरला मिठी मारली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले..

समीर:
अरे बेबी हे काय सारखं रडू बाई रडू..
मी कुठेच नाही जाणार तुला सोडून..
बाय द वे..
एक गुड आणि बॅड अशी न्यूज आहे..
तुला काल दुपारीच सांगणार होतो पण नंतर विचार केला की घरी परत जाताना सांगेन..
आणि वेळ तरी कुठे मिळाला काल तुझ्याशी शांतपणे बोलायला..

विजया:
काय झालंय..
सांग ना लवकर..
माझ्यात बिलकूल पेशन्स नाहीयेत आता..

समीर:
अगं मला बँगलोरच्या त्या कंपनीने लगेचच ट्रेनिंग साठी बोलावले आहे..
एक महिना ट्रेनिंग आहे..
आणि ट्रेनिंग संपले की जॉब पण सुरू होतोय..
आता घरी गेल्याबरोबर आपल्याला जाण्याची तयारी सुरू करावी लागेल..
फक्त दोनच दिवस आहेत आपल्याकडे बॅग पॅक करायला..
सध्या कंपनीकडून हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था झाली आहे..
आणि एका इस्टेट एजंट सोबत मी बोललोय..
सगळया ॲक्सेसरिजनी युक्त असाच फ्लॅट तो देणार आहे.
इकडून फक्त कपडे सोबत न्यायचेत आपल्याला..
तरी पण तू एक लिस्ट कर गरजेच्या वस्तूंची..
म्हणजे तिकडे गेल्यावर शॉप्समध्ये शोधाशोध करायला नको..

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Jun 09 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

 आसक्त Where stories live. Discover now