१८

3.5K 11 1
                                    

आज चिराग पाय आपटत आपटतच घरात आला..
मी त्याचा मूड बघताच समजले की आजचा टिफीन बहुतेक लाडोबाला आवडला नव्हता..
मी मुद्दाम त्याचा मूड बदलण्यासाठी म्हणाले..

मला पिझ्झा खायचा आहे बुवा..
पण कोणता मागवू तेच समजत नाहीये..
चिराग प्लीज हेल्प मी ना..

चिरागला बाहेरचे खाद्य पदार्थ शक्यतो मी टाळायचे पण आज माझ्याजवळ ऑप्शन नव्हता..

पिझ्झा हे नाव ऐकताच स्वारी एकदम खुश झाली.. पटापट सर्व ऑप्शन्स चुझ करत शेठजी ऑर्डर करून मोकळे पण झाले..
स्विगीवर फूड कसे मागवायचे हे माझ्या बाळाला अगदी नीट माहीत होते..

मला फोनवर ठराविक ॲप्स सोडले तर फारसे काहीच समजायचे नाही कारण मी कधी इंटरेस्टच घेतला नाही..
इंस्टाग्राम देखील समीरमुळे मला समजले होते..

मी नोटीस केले की, आज नेहेमीप्रमाणे चिराग फ्रेश होण्यासाठी आत गेलाच नाही..
युनिफॉर्म, सॉक्स काहीही न काढता तो तसाच टिव्हीचे एकेक चॅनल बदलत होता..
मी त्याच्या जवळ बसत आणि डोक्यावरून हात फिरवत विचारले की, स्वारी आज का बरे रुसली आहे?..
टिफीन आवडला नाही का माझ्या पिल्लूला?..
तर तो काहीच बोलेना..

परत गाल फुगवले आणि म्हणाला बाबा नसला ना की तू माझ्याकडे लक्षच देत नाहीस..
माझ्या छातीत एकदम धस्स झाले..
कारण खरेच मी परवा रात्रीपासून वेगळ्याच दुनियेत होते..
परवा रात्री याला चुकून जाग तर आली नव्हती ना?.. अशा शंकेने आणि भीतीने माझे काळीज कापत होते..

चिराग बोलतच होता..
मी तुला बोललो होतो ना मम्मा की आज आमची स्पेल-बी ची कॉम्पीटिशन आहे आणि माझे स्पेलिंग्ज लर्न करून घे म्हणून..
पण तू फोन मध्येच बिझी होतीस..
आर्या, वेदांत, सिद्धी, ईशान हे सगळे सिलेक्ट झाले पुढच्या राऊंडसाठी..
वीणा टीचर मला ओरडली..
" सच अ पुअर परफॉर्मन्स चिराग.. योर् मॉम इज अ टीचर.. राईट?"..
असे तिने म्हणताच, द होल क्लास वॉज लाफिंग ॲट मी..

माझ्या लेकराचे ते बोलणे, कोणीतरी खाडकन मुस्कटात मारावी इतके माझ्या मनाला लागले..
खरंच किती सेल्फीश झाली आहे मी..
का असे वागते आहे?..
काय मोहिनी घातली आहे या सम्यानी माझ्यावर की सगळ्या जबाबदाऱ्या मी विसरत चाललेय?..
ह्या सगळ्या विचारांनी मला खूप गिल्टी वाटू लागले..

मी चिरागला सॉरी म्हणाले आणि प्लीज बाबाला हे सांगू नकोस असेही त्याला प्रेमाने समजावले..
नेक्स्ट टाईम कॉम्पीटिशनमध्ये आपणच रॉक करणार असे त्याला प्रॉमिस केले..
पिझ्झामुळे आज मी वाचले होते पण..
पण असे कायम होऊ शकणार नव्हते..
मला स्वतःवर रेस्ट्रिक्शन्स घालावे लागणार होते अन्यथा माझ्या अजून एखाद्या चूकीमुळे मला मिळणारे हे सर्व सुख हिरावले जाणार होते..
आणि मला कोणत्याही परिस्थितीत समीरला गमवायचे नव्हते..

मी मनाशी ठरवले की समीरला समजावून सांगावे आणि त्याला भेटणे किंवा मेसेज/कॉल करणे याला काही मर्यादा घालाव्या..
असे केले तरच हे नाते अबाधित राहणार होते..
कारण अति तेथे माती व्हायला वेळ लागत नाही..

पिझ्झा खाऊन झाल्यावर चिरागची गाडी रुळावर आली..
त्याचे सर्व आवरून तो कॉलनी गार्डनमध्ये थोडा वेळ खेळण्यासाठी निघून गेला..
मी त्याला सहसा जाऊ देत नसे पण आज मला त्याचे सर्व हट्ट पुरवावेचं लागणार होते..
कारण आज मी घोडचूक केली होती आणि ती चूक लपविण्यासाठी चिरागला मला माझ्या साईडने करणे गरजेचे होते..
मी मुद्दाम त्याच्या पुढेपुढे करत होते..
हेमंतचा कॉल सोडला तर फोनला मी स्पर्श सुद्धा केलेला नव्हता..
चिराग माझ्यावर खूप खुश होता..
त्यामुळे सध्या तरी एका मोठ्या टेन्शनमधून माझी सुटका झाली होती..

पण त्याच संध्याकाळी बॅच सुरू असताना एका पॅरेंटचा फोन आला..
गेल्या महिन्यात मी ज्या टेस्टस् घेतल्या होत्या त्याचे पेपर्स मी अजून मुलांना तपासून दिले नव्हते त्याबद्दल ते मला विचारत होते..
ही अजून दुसरी चपराक बसली होती मला..
मी कधीच माझ्या कामात दिरंगाई किंवा कामचुकारपणा केला नव्हता..
मी आजारपणाचे खोटे कारण देऊन त्या पॅरेंटला समजावून वेळ निभावून नेली..
पण हल्ली माहीत नाही का मी अशा खूप चूका करत होते..

आता फक्त रात्री झोपतानाच फोन हातात घ्यायचा असे मनाशी पक्के ठरवले..
इतक्या वर्षात मी कमावलेले नाव आणि प्रतिष्ठा मला कमी होऊ द्यायची नव्हती..
पण मनावर कोणाचा ताबा असतो?..
मनाला उधाण आले की ते भरकटत जाते..

 आसक्त Where stories live. Discover now