५६

1.4K 11 10
                                    

समू..

अरे..

ऐक ना..

गेटच्या अगदी समोर एक रेड कलरची कार उभी आहे..
हद्द झाली हां तुझ्या शेजाऱ्यांची..
स्वतःच्या दारापुढे पार्क करावी ना त्यांनी त्यांची कार..
आपल्या दारात का?..

समीर झटकन उठून दारात आला..
जयूच्या पाठीमागे उभे राहून त्याने तिच्या पोटाला हातांचा विळखा घातला..
आणि खांद्यावर हनुवटी ठेवत म्हणाला..

कार आपल्या गेटसमोर आहे ना जयू?..

विजया चिडून म्हणाली..

म्हणजे काय?..
दिसत नाहीये तुला एवढी धडधडीत?..

समीर:
अरे, चिडत्येस का एवढी!..
डोकं शांत ठेऊन नीट बघ ना..
त्यावर धडधडीत काहीतरी लिहिलेले पण दिसतेय ना?..

विजया:
हो दिसतेय ना..

"सावी" असे लिहिलेय..

कोण ही सावी?..

समीरने कपाळावर हात मारला..
आणि तिला स्वतःकडे वळवले..

तिचा हात हातात घेऊन तिच्या हातावर काहीतरी ठेवले..

इश्श्य कारची चावी?..
म्हणजे ही..
ही कार तुझी आहे?..

कारकडे आश्चर्याने बघत विजया उद्गारली..

समीर म्हणाला..
ही माझी कार नाहीये..

आपली कार आहे..

समीरचा Sa आणि विजयाचा Vi..
सावी..

समीरला विजयाच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्नचिन्ह दिसत होते..

अरे बेबी..
तुला अशा अवस्थेत बाईकवर फिरवणे योग्य नाही..
आणि ऊन पण किती वाढत चाललेय हल्ली..
तुझ्या आणि आपल्या पिल्लूच्या कंफर्टसाठी कार गरजेची होती..
अचानक मिळालेल्या या दुसऱ्या सरप्राइजमूळे विजया खूप खुश झाली..
आणि समीरचे बोलणे ऐकून तिचा आनंद तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहताना दिसत होता..

तिने समीरला करकचून मिठी मारली..
कारसाठी पैसे कुठून आणि कसे आले हे विचारायची पण तिला शुद्ध नव्हती..

समीर आपल्यासाठी इतके काही करतोय आणि आपण अविचाराने राहुलची मदत घेऊन काहीतरी संकट ओढवून घेतले आहे अशी धाकधूक तिच्या मनात सुरू होती..
त्यामुळे नंतर फार काही न बोलता ती निमूटपणे कार मध्ये जाऊन बसली..

 आसक्त Donde viven las historias. Descúbrelo ahora