16.7K 32 5
                                    

हॅलो मॅम.. ओळखले का मला?
अचानक व्हॉटसअप वर असा मेसेज ब्लींक झाला आणि अर्थातच माझ्याकडे नंबर सेव्ह नव्हता म्हणून मी उत्सुकतेने प्रोफाइल पाहिला..

अरेच्च्या!  हा तर समीर..
चार वर्षांपूर्वी येत होता माझ्याकडे दहावीच्या कोचिंग साठी..
मी पण त्याच्या मेसेजला उत्साहाने प्रतिसाद दिला.. हाय समीर ! कसा आहेस रे तू?..
खूप दिवसांनी आठवण काढलीस हां..
आणि काय रे माझा नंबर कुठून मिळाला तुला?..
वगैरे वगैरे प्रश्नांचा मी त्याच्यावर भडिमार केला..

माझे मन भूतकाळात गेले..

बिच्चारा समीर..
त्याचा तो भांबावलेला चेहरा मला अगदी स्पष्ट आठवत होता जेव्हा क्लासच्या दारात त्याने पहिले पाऊल ठेवले होते..
समीर सर्व मुलांमध्ये वयाने लहान असला तरीपण शारीरिक ठेवणीमुळे दिसायला मात्र सर्वात मोठा होता..
वयात आल्याची सर्व लक्षणे समीरमध्ये सुस्पष्ट दिसत होती..
हलक्याशा मिशा..
चेहऱ्यावर मस्तशा पिंपल्स आणि घोगरा आवाज..
तो समीर मला अगदी नीट आठवत होता..

तितक्यात मोबाईल पुन्हा व्हायब्रेट झाला आणि माझे मन पुन्हा वर्तमानात आले..
समीरचे एकावर एक मेसेजेस येऊन दणकत होते..
मॅम, तुम्हाला कसा हो विसरेन मी?..
माझे गणित तुमच्यामुळेच तर पक्के झाले.. 
दहावीला शाळेत अव्वल स्थानी आलो ते केवळ तुमच्यामुळे..
तुम्हाला आठवत असेलच ना..
मी आणि साहिल गुरुपौर्णिमेला तुम्हाला भेटायलाही आलेलो दोन वर्ष..
पण नंतर इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेतले आणि तिथेच वाट लागली हो मॅम सगळी..
या इंजिनीयरिंगने आमचा पूर्ण बँड वाजवला आहे..
खूप साऱ्या लाफिंग इमोजीज टाकून त्याने रिप्लाय दिला..
अरे व्वा छानच की!..
इंजिनिअर होणार तू..
आय एम ऑल्वेज प्राउड ऑफ यू..
असे म्हणत मी देखील त्याच्याशी बोलत राहिले..

कॉलेज, मित्र, आईबाबा यापासून तर फेवरेट हिरो-हिरोईन कोणते इथपर्यंत आमच्या गप्पा वाहवत गेल्या..
अचानक बॅटरी डाऊनचा साऊंड वाजला आणि मी ताळ्यावर आले की गेल्या तीस चाळीस मिनिटांपासून मी त्याच्याशी बोलत होते..
मला खूप छान वाटत होते त्याच्याशी बोलायला आणि त्यालाही अर्थातच..
पण मला आता मनाला आवर घालणे गरजेचे होते कारण मला सकाळी साडेसहा पासून क्लासच्या बॅचेस होत्या..
आणि त्यालाही कॉलेज होते..
म्हणून गुडनाईट टेक केअर इ. साऱ्या फॉर्मलिटीज पूर्ण करून मी पटकन त्याचा निरोप घेतला आणि का कोणास ठाऊक त्याचा नंबर अगदी आवर्जून सेव्ह केला..

 आसक्त Where stories live. Discover now