माझा खूप संताप होत होता..
माझ्या डोक्यातल्या विचारांचे आता चक्रीवादळ झाले होते..
कधी एकदा या समीरला ब्लॉक करते असे झालेले मला..
मी नेट ऑन केले आणि परत एकदा माझ्या फोटोवर आलेल्या कॉमेंट्सचा वर्षाव सुरू झाला..पण मी सर्वात आधी त्याचेच नाव सर्च केले..
समीर ठाकूर..
आणि मलाच आश्चर्याचा धक्का बसला..
चक्क त्यानेच मला ब्लॉक केले होते..
माझ्या मस्तकातच सणक गेली..
या समीरने माझ्यासोबत वाटेल तशी बडबड केली आणि आता मी याला वॉर्न करण्याच्या किंवा समजावून सांगण्याच्या आत यानेच मला ब्लॉक केले?..
अरे जर दमच नाहीये मला सामोरे जाण्याचा तर मग असे बोललाच का?..
त्याचा विचार करत कधी झोप लागली समजलेही नाही..दुसऱ्या दिवशी नेहेमीप्रमाणे सर्व कामे आटोपल्यानंतर मी ठरवले होते की समीरला कॉल करून थोडेसे रागवूया..
कारण त्याचे वागणे खूप चुकीचे होते आणि एक गुरू म्हणून त्याला समजावणे माझे कर्तव्य होते..
म्हणून मी कॉल केला..
एकदा ,दोनदा, तीनदा प्रयत्न केला पण कॉल लागेचना..
नंतर ट्युब पेटली की त्याने मला कॉलिंगला ही ब्लॉक केले होते..
हद्द झाली..
माझा राग याच्यापर्यंत मी कसा पोहोचवू मला कळेना..
शेवटी मी ऑफलाईन टेक्स्ट पाठवले..
आय वॉन्ना टॉक टू यू..
आणि काहीतरी रिप्लाय येईल असा विचार करून माझ्या कामात मी मग्न झाले..
त्या संपूर्ण दिवसात त्याचे काहीच उत्तर आले नाही.. रात्री पुन्हा एकदा मेसेज केला..
रिसिव्ह झाला..
बराच वेळ वाट पाहून मी झोपी गेले पण रिप्लाय आलाच नाही..
असा जवळजवळ पूर्ण आठवडा गेला..
माहीत नाही माझी बैचेनी का वाढत होती..
मला समीरची चक्क काळजी वाटायला लागली होती.. स्वतःचा राग येत होता की एकदा भेटल्याने असे काय झाले असते बरे?..
मी त्याला हो म्हणायला हवे होते..
शेवटी न राहवून मी त्याला एसएमएस केला..
की..
आय एम रेडी टू मीट यू..दुसऱ्या सेकंदाला त्याचा रिप्लाय आला..
कधी भेटणार?..
जणू काही याच मेसेजची तो वाट पहात होता..
मी त्याला सांगितले की सोमवारी भेटूया..
तर आज का नको? असे विचारू लागला..
का इतकी घाई झालेली याला मला भेटण्याची?..
मला काहीच समजत नव्हते..
वीकेंडचा माझा सगळा वेळ माझ्या फॅमिलीसाठीच असतो सो मला तेव्हा वेळ नाही..
म्हणून मला सोमवारीच शक्य होईल..
तुझी इच्छा असेल तर दुपारी कॉलेजवरून घरी जाताना येऊन जा भेटायला..
असे मी त्याला सांगितले..
तर त्याचा ओके असा रिप्लाय आला..
YOU ARE READING
आसक्त
Romanceमी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वया...