रविवारी बऱ्याचदा सकाळचा अलार्म बंद करून हेमंत मला जास्त वेळ झोपू द्यायचा..
कुंदा आली की उठवायचा..
पण आज मात्र अलार्मच्या आवाजाने मला जाग आली..
तो बंद करण्यासाठी फोन चाचपडत असताना लक्षात आले की हेमंत आधीच उठला होता..
मीही ताडकन उठले..
आणि हॉलमध्ये आले..
पाहिले की, हेमंत टीपॉयवर लॅपटॉप ठेऊन काहीतरी करत होता..
मी त्याला डिस्टर्ब न करता माझे टूथब्रश आदी काम आवरायला सुरुवात केली..
हेमंतची बॅगही अनपॅक केली..
ते सर्व आवरता आवरता त्याचा आणि माझा चहा पण ठेवला..माझा फ्लॅट टूबीएचके असला तरी आमचा मास्टर बेडरूम पूर्णपणे माझ्या क्लासेससाठी सॅक्रिफाईस झालेला होता..
हॉलच्या पाठीमागेच हा बेडरुम होता आणि त्यालाही बाहेरून एक सेपरेट एंट्री केली होती माझ्या विद्यार्थ्यांना येजा करण्यासाठी..
त्या बेडरूमचे एक दार हॉल मध्ये उघडायचे..
त्या दाराच्या पलीकडे गेले की मी टीचरच्या भूमिकेत असायचे आणि अलीकडे असले की गृहिणी..
असा डबल-रोल मी गेल्या सात वर्षांपासून निभावत होते..माझे आवरून होताच मी चहा हॉलमध्ये आणला..
दोघे एकमेकांशी काहीही न बोलता चहाचा एकेक घोट घेत होतो..
हेमंत विचारांत गर्क होता..
मी माझा चहा पटापट संपवून आंघोळीसाठी बाथरूममध्ये निघून गेले..
क्लासकरीता माझे सर्व आवरून मी किचनमध्ये आले..
तिच्या तिच्या वेळेनुसार कुंदा आलेलीच होती..
मी तिला सर्व सूचना दिल्या..
आणि चिरागला उठवायला बेडरुम मध्ये गेले..आज सुट्टी..
त्यामुळे साहेबांचा खूप वेळ झोपण्याचा विचार होता..
पण बाबाचे नाव घेताच तो आनंदाने उठून बसला..
एकंदरीत चिराग खूपच मूडी स्वभावाचा होता..
रोज फार वेळ लावायचा शाळेसाठी आवरायला..
त्याचा कायम खेळण्याचा आणि मस्तीचा मूड असायचा..
हेमंत त्याच्या पाठी लागून त्याला लवकर आवरायला लावायचा..
कारण परफेक्ट साडेनऊ वाजता स्कूलबसचा हॉर्न वाजायचा..
आता लवकरच चिरागच्या तयारीचे हे दिव्य मला पार पाडावे लागणार होते..
चिरागला स्कूल असायचे तेव्हा त्याचा टिफीन कुंदाच भरायची कारण मला तितका वेळच नसायचा..
हेमंत सकाळचे जेवण ऑफिस कॅन्टीनलाच करायचा..
पण आज तो घरीच होता म्हणून तशी सूचना मी कुंदाला आधीच दिली होती..
वीक डेजला चिराग आणि हेमंत त्यांची वेळ झाली की मला खिडकीतून बाय करून निघून जायचे..
मला शिकवताना जास्त डिस्टर्ब होऊ नये म्हणून दोघे खूप काळजी घ्यायचे..
VOUS LISEZ
आसक्त
Roman d'amourमी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वया...