#नाती_जपतांना - कथा २

27 1 0
                                    

#नाती_जपतांना - कथा २

गर्भश्रीमंतीत वाढलेला महेश, मध्यम वर्गीय हुशार मधुराच्या प्रेमात कधी पडला हे त्या दोघांना सोडून बाकी सगळ्यांना समजत होते. घरचा थोडा विरोध पत्करून दोघे एक दिवस रजिस्टर लग्न करून एकमेकांचे झाले. कालपरत्वे दोन हुशार, समंजस गोजिरवाणी मुले झाली. सारे काही आलबेल होते.

नियती कधी कशी फिरेल, सांगता येत नाही. आपल्यांनीच आपल्याला एक दिवस घराबाहेरचा मार्ग दाखवावा हा खूप मोठ्ठा मानसिक धक्का होता महेश करता. काय होतास तू, ते, काय झालास तू, म्हणत कित्येक आपले आपले म्हणणारे पांगले. ऐन वेळेस मदत करतात ते फार कमी. जगरहाटीच ती..

पण मधुरा अत्यंत समंजस, शांत व प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची होती. तिने परिस्थिती व्यवस्थित हाताळली. सुख दुःख तर येणार जाणार, नियमित राहतो तो विश्वास, प्रेम व साथ. आपली नियत, सद्सद्विवेक बुद्धी व कष्ट करण्याची तयारी जो पर्यंत आपल्या सोबत आहे, तो पर्यंत आपण कितीही मोठ्या संकटांचा सामना करु शकतो. तिने महेशला मानसिक धीर दिला व त्याचे आत्मबल वाढवलं. गेल्या गोष्टी तिथेच सोडून, एकमेकांच्या साथीने, पुनःश्च हरी ओम म्हणत दोघं नव्याने संसाराला लागले. कष्टाला‌ न लाजता दोघांनी अहोरात्र मेहनत करून पुन्हा बरे दिवस आणले.

मुलांनी स्वतःच्या बुद्धीमत्तेवर परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून स्वतःची प्रगती केली. आपल्या आईवडिलांच्या कष्टाची त्यांनी जाण ठेवली होती. शिक्षणानंतर परदेशी मोठ्या हुद्द्यावर मोठ्याने नोकरी स्वीकारली तर धाकटीने तिथेच स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता. मिळकतीचा ठराविक हिस्सा आईवडिलांच्या सल्ल्याने ते इतर गरजुंपर्यंत पोहोचवत होते.

आज मधुरा महेशच्या लग्नाला तब्बल ३० वर्षे झाली, त्या निमित्ताने मुलांनी सरप्राइज ग्रैंड पार्टी दिली. आईबाबांचे जगभ्रमंती करायचे स्वप्न मुलांनी सत्यात आणले. त्यांची पुढच्या महिन्याची तिकीट व‌ बुकींग मेलबॉक्स मधे होती. या सगळ्याची काहीच कल्पना नसल्याने या दोघांना 'दिल डार्लिंग डार्लिंग हो गया' सारखे फिलिंग होते. आपल्या मुलांनी आपल्या करता वेळात वेळ काढून आपल्या आनंदाचा विचार करून प्रयत्न करणं हे महासुख असते, नाही का!! समाप्त..‌

-- सौरभ पटवर्धन ©®

नाती_जपतांनाWo Geschichten leben. Entdecke jetzt