#नाती_जपतांना - कथा २२

2 1 0
                                    


औफिसच्या कामासाठी बाहेर गावाला गेलेला श्याम ८ दिवसांनी परत आला तो मुळी पावसात भिजूनच.. शोभा, हे काय झाले गं? नव्या घराचं काम चालू असताना ह्या अवकाळी पावसाने नुसतं झोडपून काढले आहे.. हे काय होऊन बसले... माझे चुकले गं, आत्ता हे काम उगाच सुरू केले मी.. 


(अख्ख्या घरात जागोजागी छता मधून पावसाचे पाणी ठिबकत होतं..‌ फरशी, कपाट, ओटा अशी म्हणाल ती जागा ओलीचिंब झाली होती... सामानाचे अजुन नुकसान होऊ नये म्हणून जागोजागी भांडी, प्लास्टिक असे काय काय ठेवले होते...) सगळी परिस्थिती बघता त्याचे तर अवसानच गळाले.


आहो, ठिक आहे हो... आपल्या हातात आहे ते आपण करायचं बाकी राम भरोसे.. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ आणि काळजी तर मुळीच करू नका.. तुम्ही एवढे प्रामाणिक प्रयत्न करताय तर आपलं चांगलंच होईल, माझी खात्री आहे... दडपे पोहे केले आहेत तुम्ही पटकन खाऊन घ्या..‌ आज रात्री आपण दादा कडे राहायला जातोय, मी त्याला आत्ताच फोन केला होता.. तो निघाला आहे, येताना प्लास्टिक ची मोठी ताडपत्री घेऊन येतो म्हणाला आहे....‌


निराशेला जराही थारा न देता घरची ही अन्नपूर्णा सगळे कशी काय सांभाळते, ते तीचं ती जाणो... परिस्थिती कशी आहे त्यापेक्षा आपण त्याला सामोरे कसं जातो हे महत्त्वाचे.. कौतुकाने श्याम तिच्या कडे बघतच राहिला.. (नात्यांच्या प्रवासात पाहिजे ती फक्त आपल्यांची साथ!! )


आज धुवांधार पाऊस सुरू झाला असताना, बंगल्यातल्या झोपाळ्यावर बसून चहा पिताना श्याम-शोभाचे मन ३५ वर्षांपूर्वीच्या काळात गेले.. दोघांच्या मनात येणारे विचार ही पावसाच्या सरी सारखे थांबत नव्हते... समाप्त!! ©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाWhere stories live. Discover now