#नाती_जपतांना - कथा ९

10 1 0
                                    

#नाती_जपतांना - कथा ९

अभय, आईची औषधं आणलीस का?? ती दुपार पासून सारखे मेसेज करत आहे आठवणीचे. ५ मिस कॉल आणि १५ वेळा मेसेज आले. स्वप्नाचा सूर जरा चिडलेलाच होता.. काय तेच तेच सारखे बोलतात / विचारतात काही कळत नाही... अशक्य होतेय आता‌.. आपण त्यांना उगाच या शहरात आणलं का रे!!

हो, मी मगाशीच त्यांना औषधं देऊन आलो पण. जाताना गरमागरम वडापाव नेले होते... तेथे पाकातल्या पुऱ्या सुध्दा भरपूर फस्त केल्या व तुझ्या करता डब्यात आणल्या आहेत.. टेबल वर आहेत बघ.. आई- बाबा आपली वाट पाहत बसले होते... मग मी जरा मुद्दामच इथल्या तिथल्या गप्पा मारत वेळ घालवला.

ओह, हे खरे कारण होते तर... मी तोच विचार करत होते सारखं सारखं काय तेच तेच विचारतीये आई.. कदाचित आपण एवढ्यात गेलो नाही ना त्या घरी ती मीस करत असेल आपल्याला...

खरंय स्वप्ना, मला काय वाटतं तू आता तुझ्या आई-बाबांचे बोलणे व आत्मियतेने दिलेल्या सल्ल्यांना थोडे वेगळ्या पध्दतीने हाताळले पाहिजे... उगाच चिडून, रागावून, त्यांना फोन न करता अंतर ठेवणे हे योग्य नाही... तरी तू ठरव काय योग्य ते, मी त्यात नाही...

शहाण्याला शब्दांचा मार, पुऱ्यांचा फिडबॅक देण्यानिमित्ताने केलेला फोन तासभर चालला. व येत्या रविवारच्या जेवणाचा व दिवसभराचा बेत ही चर्चिला गेला... म्हातारपण हे एक लहानपणंच असते नाही, फक्त या वयात आपलेच विचार काय ते योग्य आहेत, असेच दोन्ही पिढ्यांना वाटत असते... थोडंसं समजून घेतलं की सारं सोपं आहे, नाही का? तुम्हाला काय वाटते!!! समाप्त!!!

©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाDove le storie prendono vita. Scoprilo ora