#नाती_जपतांना - कथा २९

1 0 0
                                    


ए आई, कोणते जुने फोटो पहात बसली आहेस, मला पण दाखव ना... आज एकदम काय, अचानक पणजी आज्जी-पणजोबांची आठवण! किती वेगळे दिसायचे ना तेव्हाची लोक, त्यांच्या सामानाची गाठोडी बघ ना! सो फनी §§§!!


हो, १०० वर्षे झाली, अक्का आज्जीने (एकट्याने) जहाज प्रवास करुन लंडन गाठले या गोष्टीला...‌ तेव्हा कुठे आली विमाने नि कुठे होते फोन...‌ पत्र नि तार व्यवहारच काय ते, आणि ते सुद्धा सर्व सामान्यांना नाही करता यायचे.. तात्या, वकिली शिकायला लंडनला गेले नि तीन वर्षे तिथेच राहिले... इथे घरचे बेचैन, मुलगा काही परत येत नाही हे पाहून.. तेव्हा अक्का होती जेमतेम वीस वर्षाची.. काही झाले तरी आपल्या नवऱ्याला भेटायचे नि परत भारतात यायचे असा जणू तिनं मनाचा ठिय्याच केला होता..


मग?? पुढे काय झाले??? (एखाद्या कृष्णधवल चित्रपटा मधले दृष्य डोळ्यासमोर आलं माझ्या... )

अक्काने काय केले, कसे समजावले सासरच्यांना, माहीत नाही! की त्यांच्या मनाविरुद्ध केले ते देवच जाणे, पण कोणाची तरी मदत घेतली नि बोट पकडून डायरेक्ट (साहेबाच्या) ब्रिटन देशात दाखल झाली. जवळ होता तो फक्त तात्यांच्या युनिव्हर्सिटीचा पत्ता नि दोघांचा ४ वर्षांपूर्वीचा फोटो... (मोडके तोडके ५-१० इंग्रजी वाक्य शिकली होती कदाचित नि डोक्यात होता फक्त एकच ध्यास!

कुठून आला असेल हा आत्मविश्वास, एवढे धाडस, वा ओढ ज्यानं एखादी बाई बापडी आपले लग्न टिकवण्यासाठी दूरदेशी‌ एकटीने जाण्या करिता तयार झाली असावी... भाषा, वेश, प्रवासाची साधनं निराळी, माणसा सारखीच माणसं, पण तरी ही वेगळीच ना..‌ (धन्य ती मनाची तयारी!!)तात्यांना काय वाटलं असेल, तिचं कौतुक वाटले असेल की राग आला असेल.. असे कित्येक विचार माझ्या डोक्यात आले. 


काश, असे पटकन भूतकाळात जाऊन एखादी गोष्ट पुन्हा पाहता आली असती तर... 'नाती‌ जपतांना' अशा कितीतरी माणसांच्या कितीतरी गोष्टी असतील नाही.. म्हणतात ना, 'बाते भूल जाती है, यादे याद आती है'. त्या प्रवासाचा, नात्याचा, आठवणींचा तो बोटीचा एक फोटोच काय तो साक्षीदार!!! कालाय तस्मै नमः!!

समाप्त!

©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाOnde histórias criam vida. Descubra agora