#नाती_जपतांना - कथा १८

5 1 0
                                    

स्वाती (नातसून), विद्यार्थीगृहात जाणारेस ना गं उद्या, ५ तारीख आहे.. होय आण्णा (वय फक्त ९२) , लक्षात आहे... तुमच्या आईचा म्हणजे माई आजींच्या वाढदिवसाची तारीख....‌ कसे हो तुम्ही इतक्या वक्तशीरपणे पाळता अजुन हे सगळं...‌


आगो, आपल्या माणसाचं कधी काही विसरतो का आपण...‌ त्या काळी परिस्थितीमुळे फार काही करता आले नाही, पण निदान या निमित्ताने माईच्या स्मृती जपता येतात... तिचे विचार जगता येतात.. तुला म्हणून सांगतो, आमची माई अत्यंत दानशूर व संयमी होती.. गरजेला तिच्याकडे सगळे धावत येत व तिने कधी कोणाला रिकाम्या हाताने परत पाठवले नाही.. कोणाला केलेली मदत तिच्या मनामध्ये ही ठेवत नसे.. या हाताचं त्या हाताला ही कळणार नाही, अगदी तसेच...‌


शेवटचं एकदा मला म्हणाली, माझ्या करता नंतर काही करावेसे वाटले तर आपण राहतो त्या समाजाकरता काही तरी करा, गरजवंत, कलावंत, होतकरू विद्यार्थी, त्यांना मदत करा... शिक्षण- मग ते कोणतेही असो, त्याने एक कुटुंब वर येते. अशा गरजूंच्या शिक्षणा करता काही करा.. व हे करताना कोठेही उदोउदो न करता करा. (किती मोठं मन असावं हे विचार करण्यासाठी)


उद्या माईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनाथ विद्यार्थीगृहात गोड जेवण असतं, ५ गरजू व हुशार मुलांची वार्षिक फी भरता येते.. त्यांचे शुभाशीर्वाद माईला, ती असेल तिथे मिळतात ग... आपल्याला त्याचे समाधान मिळते, अजुन काय हवे... देव भरपूर देतो आपण त्यातलं थोडं थोडं इतरत्र द्यावे. आपल्या माणसाचे विचार जपले, ते जिवंत ठेवले तर हीच खरी आदरांजली ठरेल... बरोबर ना!!


 (आण्णांच्या विचारांनी स्वाती भारावून गेली.. त्यांना नमस्कार करून स्वतःचेही थोडे अधिकचे पैसे घेऊन विद्यार्थीगृही जाण्याकरिता निघाली) समाप्त!!


©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाWhere stories live. Discover now