#नाती_जपतांना - कथा १४

3 0 0
                                    


ए आजी, काय गं तुझी मध्ये मध्ये गडबड.. आरामात उठ. देवाची पूजा सावकाश कर ना नंतर...‌ (पुढे काय होणार हे माहीत होते)


कारट्याsssss, आता तू मला शिकवणार आहेस का?? ये तुला चांगला प्रसाद देते आता... आजी नातवाची अशी मुद्दाम मजामस्ती चालू असते.. घरात आजीला हे असे (मजेत ही) त्याच्या शिवाय कोणी बोलायची टाप नव्हती.. दुधावरची साय त्यामुळे विशेष ओढ त्या दोघांत.


रात्री झोपण्यापूर्वी तो आजीकडून डोक्याला तेल मसाज करून घेत होता.. ए आजी सांग ना, तू सगळे वेळच्या वेळीच कसं करतेस. काय होईल उशीर झाला तर एखाद्यावेळी... (आजी आजोबा हे ज्ञान व संस्काराचे भांडार आहे, शिकावं तेवढं कमीच)


आरे बाळा, वेळ ही खूप अमुल्य आहे रे, एकदा गेली तर परत येते का? वक्तशीरपणा, शिस्त व सातत्य हे आपल्या आयुष्यात असलेच पाहिजे.. त्यामुळे आपली प्रगती होते.. नियती, निसर्ग नियमितपणे योग्य त्या वेळी स्वतःमध्ये परिवर्तन करत असतो. आपल्याला भरभरून दान देत असतो. आपण हे असे नेहमी शिकत राहावं, चांगल्या गोष्टी आत्मसात करत राहावं.. (असे निरनिराळे विचार वेळोवेळी त्याच्या मनात कुठेतरी रुजत होते)


आजी, किती छान सोपं सांगतेस गं... मला तू म्हणूनच खूप खूप आवडतेस... आय लव यू ग्गोड आजी... (डोळ्यातला आनंद कसा वर्णावा) प्रेमळ नात्यांचे हे संस्कार अत्यंत अलगदपणे पहिली पिढी तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवत असते... जगातला कोणताही देश असो, कोणतं ही शतक असो, हे प्रेमाचे नातं असेच होते , आहे व राहील... समाप्त!! ©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाDonde viven las historias. Descúbrelo ahora