#नाती_जपतांना - कथा २५

3 1 0
                                    

काही गरज नाहीये एवढी दगदग करायची, अभि अमेरिकेहून येईल, ४ दिवस राहिल, त्यांची कामं करून तिच्या माहेरी जातील सगळे. आपण दोघं बसू परत डोळे लावून, सरलाताई जरा तणतणतच होत्या दोन दिवसांपासून. आपलं काही आहे का त्यांना, येतात, होटेल सारखे राहतात, गिफ्ट देऊन वरवरची चौकशी केली म्हणजे झाले का?

तू चहा घेशील का, अशी सारवासारव करत आहोंनी मोठ्या शिताफीने वातावरण शांत केले. संधी साधून, त्यांनी विषय काढला - लग्नानंतर आपण कसं मुंबई हून कोकणात गणपतीला जायचो, किती छान असायचे ते ४-५ दिवस, स्वप्न सत्यात उतरावे असे.. दोघांचे मन आठवणींनी सुखावले नि पुढचा एक तास कोकणातल्या गणपती आठवणींत रमला..


सरला, तेव्हा आपण नोकरीकरता आपलं घर- कोंकण सोडून मुंबईत आलो. नि सणावाराला गावच्या घरी जायचो. तसं पाहिलं तर तिथल्या लोकांना आपण आजचे अभि होतो. पण ते किती अगत्याने करायचे सारे. ते दिवस आजही आपल्या मनात विशेष घर करून आहेत.. 

मग आपणही आपल्याला जमेल तेवढे अभि व त्याच्या कुटुंबाचे स्वागत मनापासुन करुया. व्याह्यांनाही तेव्हा आपल्याकडे राहायला बोलावूया. अधिक मास, दसरा, दिवाळी म्हणजे हे चार दिवस असेच समजूया. (स्वतः:ला समोरच्याच्या भूमिकेत पाहिलं की नाती हळूवार खुलतात ना...)

ठरल्याप्रमाणे तिन्ही कुटुंब आपलेपणाने मनापासुन एकत्र आली. ४ दिवसांनी, या दोघांनाही, स्वतः व्याही आवर्जून आपल्या घरी घेऊन गेले. अमेरिकेला परत जाताना या वेळी सगळेच पुन्हा मुंबईला आले. 


यंदाची भारत-भेट अभि व कुटुंबाला खासमखास होती. (आहे ती परिस्थिती आनंदाने स्वीकारली की गोष्टी कशा सोप्या होतात ना..‌ ) समाप्त!

©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाWhere stories live. Discover now