#नाती_जपतांना - कथा २३

2 1 0
                                    

स्मिता, काय हा उतावळेपणा, कशी गं तुमची हि आजची पिढी. मनात येईल तसं वागता, हे असं चांगले नाही.. पुढचा भविष्याचा जरा विचार करा, आयुष्यात प्लॆनिंग वगैरे काही पाहिजे की नको!


हो गं आई.. काय तुझं आपलं सारखं तेच तेच... मला माहित आहे गं.. आयुष्य असं ठरवून जगता येतं का? नुसता भविष्याचा विचार केला तर आज आत्ता कशी जगू.. तू नको काळजी करू आमची, आम्ही दोघं बघतो काय ते. ठिक आहे!! असे गोड गोड आणि गोल गोल बोलण्यात हे दोघंही (नवरा बायको) हुशार होते.


त्या जुन्या आठवणीं पासून ते आता नव्या जीवाची चाहूल लागल्या पर्यंतचे स्मिता मध्ये होणारे बदल आई टिपत होती.. होईल, करू, बघू, माहीत नाही, असे सगळे भविष्यात जगणारी ही पिढी आता आज - आत्ता - प्रत्यक्षामध्ये येत होती.. आपल्या वर कोणी तरी अवलंबून असणार आहे, हा नवा जीव आपला आहे, हे जाणवताच त्या दोघांच्यात आई-बापपण जन्म घेत होते..


डॉक्टरांच्या अपौईंटमेंट पासून ते वेळच्या वेळी आहार व नियमित व्यायामा पर्यंत आणि वाचनापासून ते दररोजच्या मेडिटेशन पर्यंत सगळे प्रयत्न दोघं ही करत होते... आई-बाबा या भूमिकेत आल्यावर प्रत्येक जणच आपल्याला जमेल तसे- होईल तेवढं, सारं काही करतात.. 


नाती जपतानांचा हा बदल आईला - आजीच्या भूमिकेत आणि मुली-जावयाला आई-वडिलांच्या भूमिकेत आनंदाने घेऊन जात होता.. वेळ, प्रांत, पिढी, कोणतीही असो, आई-वडिल व त्यांचे आपल्या अपत्याप्रती असलेले प्रेम हे नेहमी निर्व्याज, नैसर्गिक असते... समाप्त!


©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाWo Geschichten leben. Entdecke jetzt