#नाती_जपतांना - कथा १५

4 0 0
                                    


काय माधव राव, आहात कुठे? मागचे चार दिवस तुमचा पत्ता नाही... सकाळी टेकडी वर आला नाहीत, संध्याकाळी आपल्या कोपऱ्या वरच्या अड्ड्यावर पण नाही. ओनलाइन पण फारसे नव्हता नि फोनही उचलला नाही..


हो हो, काय विचारु नका... मागचे दोन चार दिवस कसे गेले काही कळले नाही, माझा नातू अक्षय आला आहे ना बोर्डिंग स्कूल वरुन... सगळा दिवस त्याच्या सोबतच होतो.. पहाटे उठल्यापासून ते रात्री पर्यंत तो म्हणेल तसे चालू आहे... (डोळे आनंदाने लुकलुकत होते)


त्याला बोर्डिंग स्कूलला पाठवायचे ठरले ते मला अजिबात आवडलं नाही पण बोलणार कोण आणि बोललो तरी ऐकतंय कोण? हे काय वय आहे, घराबाहेर राहायचं.... गरजच नव्हती, ६ महिने माझे त्याच्या विचारात कसे गेले माझं मलाच माहीत.. असो.. (माधवराव सगळे धडाधड बोलत होते)


पण खरे सांगू का, नातवा मध्ये झालेले बदल अगदी लक्षणीय आहेत.. स्वावलंबी, संयमी व शिस्तबद्ध वागणं, चौकस विचार व सामान्य ज्ञान वृध्दी हे खरेच मागच्या सहा महिन्यां मधले बदल आहेत. मला खूप आनंद वाटला, त्याची प्रगती पाहून... खरंच त्याच्या आई वडीलांनी घेतलेला निर्णय योग्यच होता, मी त्यात आजोबा म्हणुन ढवळाढवळ केली नाही याचा आज आनंद वाटतो..


तेव्हा ठरवलं, तो ४ दिवस आहे घरी तर आपण पुर्ण पणे त्याच्या करताच वेळ ठेवायचा... उगाच मी, माझे रुटीन, असं आडमुठेपणा नको.. घरच्यांच्या कलाने घेऊन छान वाटले हो... शेवटी कुटुंबाचा क्वालिटी टाईम महत्वाचा, नाही का!! सुख, सुख म्हणजे तरी आणखी काय!!! 

(आजची प्रभात खरेच सुप्रभात झाली होती) समाप्त!

©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाDove le storie prendono vita. Scoprilo ora