#नाती_जपतांना - कथा ११

5 0 0
                                    


शंतनु, आरे काय रे!! 

आल्यापासून नुसता बाहेर हुंदडत आहेस.. सुट्टी सुरू होऊन संपेल आता.. (१० दिवसांच्या सुट्टी घेऊन आलेल्या शंतनु चे बाबा)

अहो बाबा, होय हो... त्याकरताच तर सुट्टी आहे ना, मजा मस्ती धमाल!! खरे सांगू का, सगळ्या मोठ्या (ज्येष्ठ) माणसांना भेटायला जाण्याचा जो आनंद आहे ना, ती भावना फक्त अनुभवता येते... त्यांच्या डोळ्यातला आनंद, प्रेम व आशीर्वाद यांची तुलना कशाचीही करता येत नाही.. सगळ्यांनी माझ्या आवडीचे (आठवणीने) केलेलं केवढे काय काय पदार्थ जगात कुठेही मिळत नाहीत..‌


मित्र-मैत्रिणीं बरोबरची दोस्ती एक तरफ नि बाकी दुनिया एक तरफ हे उगाच का म्हणतात... फुल टू धमाल असते.. हा आता सगळे आपापल्या क्षेत्रात व्यस्त आहेत पण तरीही मी आलोय हे कळताच वेळात वेळ काढून आम्ही भेटलो.. मैत्रीचे टौनिक बाहेर कुठे मिळेल...


सुट्टी वरुन परत गेल्यावर ह्या आठवणी, गप्पा, आनंद या वर तर पुढचे काही दिवस, महिने जातात आमचे.. हा आता मोबाईल वर व्हिडिओ कॉन्फरन्स होतात पण प्रत्यक्षातली मजा निराळीच... सगळ्यांना नाही भेटता आलं या वेळी पण निदान काही जण तरी हे ही नसे थोडके.. (समाधान हे मानण्यावर आहे)


आनंदाने डोळे चमकणाऱ्या शंतनु कडे कौतुकाने बघत बाबांचा चेहरा प्रफुल्लीत झाला.. खरंय बाळा, असाच सगळ्यांना जोडत राहा, नेहमी आनंदात राहा... समाप्त..


©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाWhere stories live. Discover now