#नाती_जपतांना - कथा २६

12 1 0
                                    

वीणा, झाली का तुझी स्वयंपाकघरातली उद्याची तयारी? अजून काही आणायचं असेल बाहेरून तर सांग, मी उद्या सकाळी परत बाहेर जाणार नाहीये.. बाकी मी पूजेचं सगळे साहित्य, फळे, फुले, नारळ, आणि सगळे काही आणले आहे. उद्या सकाळच्या कामांची माझी यादी तयार आहे. मावशी केर- फरशीला ७ ला येणार आहेत. गुरुजी १० ला येतील तसे सगळ्यांना (आप्तेष्ट) कळवले आहे.


हो विनीत, माझे सगळे रेडी आहे, आज करायची ती सगळी कामं झाली आहेत. माळ्यावरून जादाची वाढायची, जेवायची भांडी, काढून धुवून पण घेतली आहेत. आता फक्त देवीचे माळा वस्त्र करते की झाले. उद्या ५चा गजर लावला आहे. किती छान वाटते ना, हि वार्षिक पूजा असली की. प्लैनिंग, तयारी, १५-२० जणांचा सगळीकडे वावर, घर अगदी प्रसन्न होते नि आपले मनही टवटवीत फुलते.


हो गं, आमचे माई-अण्णा म्हणायचे, सण वार, पूजा अर्चा आपल्या सगळ्यांच्या सहवासात कराव्यात. घरची श्रीमंती घराबाहेर असलेल्या चपलांवरुन ठरते (एकाच माणसाचे ५ जोड असे नाही हा!!) शेवटी काय, आपली माणसं नि त्यांचे शुभाशीर्वाद हीच आपली खरी पुण्याई (कमाई) आहे! 


मोठ्यांचे आपल्याबरोबर असणे, त्यांच्या देखरेखीखाली काही गोष्टी करणे हे निव्वळ आनंददायी आहे, लहान मुलांवर त्यामधूनच आपोआप संस्कार होत असतात. (माई-अण्णा फोटोतून जणू हसत होते..‌ नात्यांच्या सहवासात एक घर उद्या आनंदाने तृप्त होणार होते!! ) समाप्त!

©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाWhere stories live. Discover now