#नाती_जपतांना - कथा ४

16 1 0
                                    

#नाती_जपतांना - कथा ४

अरे समीर, कोणाचे पत्र आले आहे का रे ??
आजी, आहो गेले ४ दिवस तुम्ही दररोज हेच विचारताय. कोणाच्या पत्राची एवढी वाट पाहताय???
अरे माझ्या अमेरिकेतल्या मैत्रीणीचे पत्र आले नाही रे, एक महिना झाला..
काय?? तुमची मैत्रीण अमेरिकेत असते? तुम्ही आता ९१ वर्षाच्या म्हणजे त्यांचे वय किती आहे?
तुला कशाला रे चौकश्या!! तरी ऐक, लक्ष्मीताई आता ७८-८० च्या घरात असतील.

आम्ही दादर मध्ये राहत होतो ना , तेव्हाची ओळख. रस्त्याने जाताना अचानक भोवळ येऊन पडल्या त्या. मी चटकन पाणी व खडीसाखर दिली व त्यांना घेऊन आमच्या जवळच्या वैद्याकडे नेले. तिथे गेल्यावर कळलं, त्या गरोदर आहेत. त्यांच्या मिस्टरांना निरोप पाठवला व ते घरी आल्यावर मग मी निघाले.

त्या काळात म्हणजे १९५० च्या दरम्यान त्यांचा प्रेमविवाह असल्याने दोन्ही घरांना त्या पोरक्या झालेल्या होत्या हे मला नंतर कळाले. त्यांचा नवरा खूप हुशार, शास्त्रज्ञ पण तसा तऱ्हेवाईक स्वभावाचा असल्याने ओळखीची दोन चार घरची लोकच काय ती बाळंतपण झाल्यावर. मी जमेल तशी मदत केली, काय हवं नको ते पाहिलं, त्यामुळे आमची मैत्री अजुन घट्ट झाली.

छानश्या गोंडस मुलाच्या जन्मानंतर ४-५ महिन्यातच ते सगळे अमेरिकेला गेले ते कायमचेच. पण आम्ही दोघी एकमेकींना त्या काळी ३-६ महिन्यातून एकदा असे पत्र पाठवायचो. हे तर गमतीत म्हणायचे सुध्दा, आम्हाला नाही कोणी मित्रपरिवार परदेशात!!! पुढे आमचे पत्ते बदलत गेले पण आमचा पत्रव्यवहार चालूच राहीला.

१९८३ मध्ये आम्ही अमेरिकेला फिरायला गेल्यावर त्यांच्या घरीच १५ दिवस राहिलो होतो. त्यांना तिथे भारतातून पत्र पाठविणारी मी एकटीच. आमच्या सगळ्या पत्ररुपी गप्पा आम्ही दोघींनी व्यवस्थित जपून ठेवल्या आहेत रे.. आताशा त्यांचा फोन पण येतो अधुनमधून, पण इथुन करता येत नाही.. आमची या जन्मात परत प्रत्यक्ष भेट होईल का माहित नाही, पण पत्रातून आम्ही सतत भेटत असतो... कळलं काss समीर.. ..‌

खरेच या जुन्या पिढीतील लोक किती मायाळू व माणूसकीची नाती जपणारी आहेत. 'ना नात्याची ना गोत्याची' असं तरी कसं म्हणणार या कमला-लक्ष्मी आज्जींना.. खरा मैत्री दिवस तर मी या दोघींना डेडिकेट करतो.. आता मी पण आतूरतेने त्यांच्या पत्राची वाट पाहू लागलो... समाप्त

-- सौरभ पटवर्धन ©®

नाती_जपतांनाWhere stories live. Discover now