#नाती_जपतांना - कथा १९

4 1 0
                                    

रविवारी येताय ना, जेवायलाच या आणि मग तुमचे हिशोब नि वाटण्या करा, असे मेधाने दोन्ही नणंदांना आग्रहाचे आमंत्रण दिले.. सासूबाईंच्या इच्छेनुसार त्यांचे दागिने व संपत्ती वगैरे, सारं काही तिघा मुलांमध्ये समसमान वाटले जाणार होते..


छान चवदार जेवण झाल्यावर मोठ्या दोन्ही बहिणी व धाकटा भाऊ यादी घेऊन आतल्या खोलीत बसले. यादीनुसार समोर वेगवेगळ्या आकाराच्या डब्या, पिशव्या, बौक्स सारं काही मांडले. मेधा, येतियेस ना, तुझ्या करता थांबलोय गं, असे म्हणत वन्संनी आवाज दिला.. मेधा अत्यंत नम्रपणे म्हणाली, मला लग्नात सासू-सासऱ्यांनी सारे काही केले आहे, आता आहे हे तुम्हा तिघांचं, तेव्हा मी या मध्ये नाही..


मेधा काही आपले ऐकत नाही, म्हणाल्यावर शेवटी बहिणी -भावाने यादी लिहायला सुरुवात केली.. दागिना व त्याचं वजन असे लिखाण करत, तिघांनी एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन शिल्लक राहिलेल्या गोष्टी निवडल्या... हे तुला ठेव , हे तुला आवडतं असे करत तिघेही इतरांचा विचार करत होते.. कोणताही वाद नाही नि तंटा नाही...


आपल्या भावा-वहिनीने आई वडीलांची किती छान सेवा केली हे दोन्ही बहिणी जाणून होत्या. शेवटी आपापल्या वाटणीचे एक मोठ्या वजनाचे ऐवज आपल्या कडून भेट,असं सांगून भाच्यांच्या नावाने दोघींने बाजूला ठेवले. हे समजताच मेधा अगदी नि:शब्द झाली. कुठे संपत्ती वरुन भांडणारे नि कुठे स्वतःहून दुसऱ्यांना देणारे, खरंच नात्याची हि गोष्टच निराळी! समाप्त!!


©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाWhere stories live. Discover now