#नाती_जपतांना - कथा ८

15 1 0
                                    

#नाती_जपतांना - कथा ८

वहिनी, येऊ का?? आईला दवाखान्यात दाखल केलं आहे , आत्ता तिथुनच आले.. डाक्टराने १८,००० रुपये जमा कराया सांगितले आहे... आमच्याकडे २५०० च आहेत, तुम्ही करता का काही?

ताराचे बोलणं ऐकून रमाला कसेसेच झाले. नुकतेच स्वतःचे घर विकून रमा व कुटुंब भाड्याने नव्या ठिकाणी राहायला लागली होती.. ताराची आई, म्हणजे लक्ष्मीबाई (आजी) रमाकडे मुलं सांभाळायला व वरवरचे काम करायला गेली १० वर्षे पूर्ण वेळ असायच्या..‌ परंतु आर्थिक दृष्ट्या शक्य होणार नसल्याने मागिल वर्षभर रमाकडे आजी कामाला नव्हत्या.

मला एवढे पैसे देणे शक्य नाही गं, पण आपण करुया काहितरी.. तो पर्यंत चहा घे, म्हणत रमाचे विचारचक्र सुरू झाले. गेल्या ३० वर्षांत लक्ष्मीबाईंनी धुणे भांडी व इतर काम केलेल्या सगळ्या घरी ती ताराला घेऊन गेली. आजही जमाना माणूसकीचा होता, आजींची व रमाच्या कुटुंबाची परिस्थिती सगळ्यांना माहीत होती. थेंबे थेंबे तळे साचे, उक्ती प्रमाणे १०-१२ घरात मिळुन पुढच्या तासात रु. १५,००० जमले. अजुन पैसे लागले तरी काळजी करु नकोस असेही कित्येकांनी सांगितले. फुल ना फुलाची पाकळी, पदरचे ५०० रु देऊन रमाने आजींचे उपचार सुरू झाले..

खरंच काम कोणतेही असो, आपला स्वभाव, निष्ठा, काम, प्रामाणिकपणा हा कुठेतरी कोणीतरी नोंदवत असतो. पुढच्या चार दिवसांत आजींचे उपचार यशस्वी झाले. बहुतेक सगळे जण आजींना भेटायला, चौकशीला आले. आजींनी कमावलेले माणूस रुपी धन हिच त्यांची खरी संपत्ती होती.... रमाच्या युक्तीने अवघड काम सोपं झालं होतं.. म्हणतात ना, इच्छा असेल तेथे काही तरी मार्ग हा असतोच... समाप्त!!

©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाHikayelerin yaşadığı yer. Şimdi keşfedin