#नाती_जपताना - कथा ६

9 1 0
                                    

#नाती_जपताना - कथा ६

आई, आजचा स्पर्धा परिक्षेचा पेपर खूप खूप खराब गेला. एकदमच भंकसगिरी झाली..
ते ठीक आहे, एवढंच सांग की तुला येत होते ते तरी तू लिहिले आहे की नाही.. बाकी जास्त विचार करू नकोस.
हो गं, जे माहिती आहे ते लिहून आलो. पण मला फार काही अपेक्षा नाही.. मी नाही जाणार उद्याच्या पेपरला..

खबरदार हे असलं काही डोक्यात आणले असशील तर.. आपण आपल्या कडून सगळे प्रयत्न करायचे. त्या उप्पर राम भरोसे.. पण म्हणून प्रयत्नच करणं सोडलेले मला चालणार नाही. आजचा पेपर झालाss, आता उद्याच्या तयारीला लाग.

(घरोघरी होतात तसे माय-लेकांमध्ये धमाशान चर्चा/ वादविवाद झाले... थोड्या वेळाने आई आपल्या कामाला लागली व नाईलाजाने मुलाचा अभ्यास सुरू... तरी डोक्यात विचार चालूच होते... )

यार, आपली आई आता पन्नाशीला येऊनही एवढे कष्ट करते तरी सुद्धा, नेहमी उत्साहिच असते. ना कधी तिच्या चेहऱ्यावर ताणतणाव जाणवतात ना ती कधी निराश होते. तिच्या बोलण्यात वागण्यात फक्त सकारात्मकता आहे.. माझा पेपर कसा गेला हे ऐकूनही तिचा विश्वास कमी नाही झाला. मग मला का एवढे निगेटिव्ह वाटतंय.. आई करता तरी मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे.. निदान तेवढं तरी मी करु शकतो.

बाकीचे पेपर तसे बरे होते.. दोन महिन्यांनंतर निकाल आला व जो पेपर टफ गेला होता त्यात जेमतेम पास होईल एवढे मार्क मिळाले व बाकीच्या पेपर मुळे सरासरी निकाल पास... मुलाच्या चेहऱ्यावरचे व आईच्या डोळ्यातले कौतुक व आनंद ते दोघेच जाणोत... समाप्त

©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाWhere stories live. Discover now