#नाती_जपतांना - कथा १६

3 0 0
                                    

घरी मोठं कोणीही नाही, दोन भाऊ एकमेकांच्या साथीने मोठे झालेले. मागची ७-८ वर्षे विविध खानावळीत जेवून बाहेरची अन्नाची चव अगदी नकोशी झाली होती. मोठ्या भावाचे आत्ता एवढ्यातच लग्न झालेले. नवी नवरी, राधा, घरात येऊन थोडी स्थिरावते न तोच "वहिनी, आज पिठलं भाकरी होऊन जाऊ द्या जेवताना" अशी, धाकट्या दिराची म्हणजे अविनाश ची फर्माईश आली... हो, करते की, असं म्हणाले खरी पण राधाला दडपण आले होते.


शेजारच्या काकूंना बोलता बोलता भाकरी पिठलं कसं करतात, हे राधाने विचारुन घेतले. त्या काळी आजच्या सारखे कोणी ओनलाइन शिकवणारे नव्हते... (विचार करून गम्मत वाटते पण तो काळच वेगळा होता....)

 शक्यतो सासू सासरे असलेल्या घरीच मुलगी द्यायची पद्धत होती, पण राधाच्या नशिबी तो योग नव्हता..

मनात देवाचं नाव घेऊन अन्नपूर्णेला नमस्कार केला व बेसन फोडणीला टाकलं... पीठ मळून भाकरी थापायला घेतली.. आई कसे करायची, हे आठवून श्री गणेशा केला.. पहिल्या भाकरीचे तुकडे होऊ लागले, तेव्हा ती स्वतः करता बाजूला ठेवून, पुढच्या दोन करपलेल्या नवऱ्या करता बाजूला ठेवल्या.. आता उरलेल्या तरी नीट होऊ दे रे, देवा!!!! मनापासून प्रयत्न केल्याने पुढच्या ४ बऱ्यापैकी छान झाल्या..


जेवताना सगळा प्रकार लक्षात येताच, अविनाश ला अगदी कसेसेच झाले.. आपल्या इच्छेखातर वहिनीनं केलेल्या प्रयत्नांना, अगदी मनापासून त्याने दाद दिली. वहिनीच्या छोट्याशा कृतीतून अविनाश एकदम भारावून गेला..


आता या प्रसंगाला ५० वर्षे झाली तरी वहिनीनं पुरविलेले हट्ट आजही अविनाश अतिशय आदर व कौतुकाने सगळ्यांना सांगत असतो..‌ नवं नातं कसं जुळते, हे केवळ व्यक्तिसापेक्ष आहे!! तुम्हाला काय वाटते!! समाप्त!

©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाWo Geschichten leben. Entdecke jetzt