#नाती_जपतांना - कथा १२

5 0 0
                                    

आज त्यांच्या लग्नाला ९ वर्षे पूर्ण झाली.. उमेश व गौरी, म्हटलं तर त्यांचे घरच्यांनी पाहुन केलेलं लग्न नि म्हटले तर प्रथम भेटी मधला त्यांचा प्रेम विवाह..


ते दोघेच बाहेर रेस्टॉरंट मध्ये ठरवुन भेटले.. नेहमीच्या हवा-पाण्याच्या गप्पां नंतर उमेशने गौरीला स्पष्टच सांगितले. मी माझ्या पायावर उभा राहतो आहे, घरचे खूप काही भरभक्कम आर्थिक पाठबळ नाही.. सध्या परिस्थिती बेताची आहे पण माझी स्वप्नं मोठी आहेत व ती माझ्या मेहनतीने नक्कीच पुर्ण होणार आहेत.. तू विचार कर व काय ते सांग.. स्वकर्तृत्वावर मोठे होण्यातील मजा काही औरच, तुला आवडेल?


गौरी होती वयाने तशी लहान पण आपल्या विचारांवर पक्की होती. काय हवंय व काय नकोय हे तिला नीट माहीत होते.. व्यक्तिमत्त्व, विचार व कर्तुत्व हे घरच्यांच्या संपत्ती पेक्षा तिच्या साठी अधिक महत्त्वाचे होते. तिने त्याला ठामपणे सांगितले, मला घरादारात नाही, माझ्या साथीदारामध्ये जास्त रस आहे..


झाले, दोघांचे बाकी बऱ्याच विषयावर एकमत दिसत होते, आवडी निवडी या त्या वेळी तरी अगदी एकरुप वाटत होत्या. दोघांचे "हा च /ही च" हे पहिल्या भेटीतच ठरले व ते दोघांच्या घरातून मान्यही झाले. नियतीच्या आशीर्वादाने सगळे यथोचित पार पडले..


दोघांनी एकमेकांना समजून साथ देऊन स्वतःचे सुंदर जग बनवले.. आज ९ वर्षे होतांना बाकी परिस्थिती उत्तम आहे. दोघांनी मिळून केलेल्या प्रगतीचे आलेख अगदी स्पष्ट दिसत आहेत.. दोघांचे कष्ट, प्रामाणिकपणा व मोठ्यांच्या आशीर्वादाने सगळे सुखासमाधानाने नांदत आहेत.. समाधान, समजूतदार स्वभाव व नातं जपण्याची ओढ असेल तर सुख हे असणारच ना!!! समाप्त!!!


©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाWhere stories live. Discover now