#नाती_जपतांना - कथा १०

8 1 0
                                    

#नाती_जपतांना - कथा १०

नंदा व सुरेश आज सकाळी घरी आले ते हातात सामोसे पार्सल घेऊनच... भाऊजी, सुमाच्या लग्नाचे समजले म्हणून आनंदाने न सांगताच आलो. हे घ्या गरमागरम सामोसे, वहिनी चहा टाका!!!! कोण आहे मुलगा, कुठला, काय करतो, घरी कोण, कधीचा मुहूर्त, तयारीचे काय असे अगणित विचार तिच्या डोक्यात होतेच...‌ (नंदाच्या उत्साहाला कधीच कोणती मर्यादा नसते...)

गप्पा टप्पा झाल्या, सगळे विषय व्यवस्थित चर्चा करून झाले. सगळी माहिती इत्यंभूत सांगितली.. सुमाच्या चेहऱ्यावर होऊ घातलेल्या नववधूचे तेज स्पष्ट दिसत होते.. तिचा हसरा चेहरा सारे काही बोलत होता.

देणे घेणे तसं फारसं नव्हते तरी आईवडील मुलीला शक्य होईल तेवढं करणारच ना... सध्या सुमाच्या आई-बाबांचे दिवस पहिल्या सारखे राहिले नव्हते. मुलीच्या वाढत्या वयाचा विचार करून दोघांनी सुयोग्य वर शोधला होता.... सगळे सोंग आणता येईल पण पैशाचं सोंग कसं घ्यावे...

नंदा - सुरेश ने आणलेले, दोनशेच्या नोटांचे पाकीट त्यांनी देवासमोर ठेवले व कोणाचं काही न ऐकता सुमाच्या लग्नात आपला हातभार लावला.. एकदा एखाद्याला आपले म्हटले म्हणजे मग त्यात सगळेच आले नाही का!! समाप्त.....

©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाWhere stories live. Discover now