नाती_जपतांना - कथा ३१

3 1 0
                                    


वामनराव, एवढ्या मोठ्या बंगल्यात तुम्ही एकटे राहता, कमाल आहे राव!!! 

भीती वा एकटेपणा नाही का जाणवत?? (मित्र १) 

भाडेकरू वा पेईंग गेस्ट का नाही ठेवत. तेवढीच सोबत हो... (मित्र २)

अथवा, हे घर विकून छोटेखानी अपार्टमेंट का नाही घेत.. (मित्र ३)

करायचं काय या वयात एवढे घर, देखरेख ठेवणे काय खायचं काम नाही.. (मित्र ४)


(वामनबुवा निर्विकारपणे आलेल्या सर्वांचे ऐकत होते, कोणतीही प्रतिक्रिया न देता!!! हे ही एक कौशल्यच असते की!! ) काहीच प्रतिसाद मिळाला नाही म्हटल्यावर विषय आपोआप बदलत गेला.. गप्पा टप्पा झाल्या नि सगळे आपापल्या घरी परतले.. नि वामनराव परत बागेत झाडांना पाणी देण्यात व्यस्त झाले.. 


तसे पाहिले तर, आज या घरात जागोजागी वामनरावांच्या कितीतरी आठवणी आहेत.. आधी आई वडिलांच्या, मग स्वतःच्या संसारातल्या, मुलं लहान असतानाच्या नि आता वर्षातून एकदा परदेशातील येणाऱ्या नातवंडांच्या...


आठवणीच त्या, हळव्या कोपऱ्यात कुठे तरी घर करून बसलेल्या असतातच.‌ आज या घरात राहताना त्यांचा जो कम्फर्ट आहे, आनंद आहे वा समाधान आहे त्याची सर कशालाच नाही... शेवटी घराशी असलेलं नातं ते मनापासून जपत होते.. नि म्हणूनच वास्तू तथास्तु म्हणत असते.. 


आपल्या मनावर तसं पाहिलं तर फक्त आपलेच नियंत्रण असावे. (कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम हे केहना!!) मग निदान निर्णय आपला असला, तर होणाऱ्या परिणामांची तमा तरी नसे... बरोबर ना!! समाप्त!


©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाWhere stories live. Discover now