#नाती_जपतांना - कथा ३

15 1 0
                                    

#नाती_जपतांना - कथा ३

आज भल्या पहाटेच उठून स्वतःचे आवरून आशा स्वयंपाकाला लागली. पहाते तर मागे माधव बाकीची औफीस व ध्रुवच्या शाळेची तयारी करत होता.‌

संध्याकाळी घरी आल्यावर होळी निमित्त पुरणपोळीचा बेत होता, त्यामुळे जमेल तेवढी तयारी सकाळीच करून तिचा औफीसला जायचा प्लॅन होता. आजकालच्या जगात कोण घालतंय पुरणा वरणाचा घाट.. बाजारात ढिगाने पर्याय उपलब्ध आहेत आता. तिलाही आधी असेच वाटायचे. तिने २-३ वर्षांपूर्वी तसे घरात सांगुनही पाहिले पण आई काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी आशा घरी यायच्या आधी स्वतःहून सगळे तयार ठेवले होते. आईंच्या हातची चव बाजारात नाही हे तितकेच खरे. घरची गरमागरम पुरणपोळी खातांना माधव व ध्रुवचा आनंद व आईंच्या डोळ्यातले समाधान आशाने टिपले होते..

आईंच्या आवडीचा मान राखत माधव आशाने‌ ठरवले व एकमेकांच्या साथीने गोष्टी सोप्या झाल्या. वर्षातून एकदाच होळी साजरी करतात, त्या निमित्ताने पुरणपोळीचा नैवेद्य. गेल्या वर्षी तिने आईंच्या बरोबर राहून निट प्रोसेस समजून घेतली व आज स्वतःहून सगळे ताब्यात घेतले.

पुरण गरम असतानाच माधवने ते वाटून दिले होते. संध्याकाळी घरी आल्यावर पुढच्या तासा भरात नैवेद्याच्या ५ गरमागरम पोळ्या व बाकीचे सगळे तयार होते. लांब बसून ध्रुवला खेळवत आई सगळे बघत होत्या. न सांगताच नंतरचा पसारा आवरून आशाच्या कामात हातभार लावत होत्या.

रात्री जेवताना प्रथम त्यांचे आहो, मुलगा, सून, नातू, सगळ्यांना वाढून मगच आईंनी पुरणपोळीचा आस्वाद घेतला. खरेच खूप छान झाली होती पुरणपोळी व त्या मागे घेतलेल्या आशा माधवच्या मायेच्या कष्टांनी ती अजून गोड लागत होती. पोटभर कौतुक ऐकून व ध्रुव मनापासून जेवल्यानंतर त्या दोघांनाही मनस्वी आनंद व समाधान वाटत होते.

शेवटी सण हे आपल्या आनंदाकरता असतात व आपल्यांच्या आनंदातच आपले समाधान असते ना.. समाप्त

-- सौरभ पटवर्धन ©®

नाती_जपतांनाDonde viven las historias. Descúbrelo ahora