डॉक्टर, हे बरे होतील ना! काही काळजीचं नाही ना!! (नवऱ्याला नुकताच मैसिव्ह हार्ट अटैक आल्याने शेजारच्यांच्या मदतीने लगेच जवळच्या दवाखान्यात दाखल केले होते..) आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत, या पेपर वर सही करा व बाकीच्या औफिस फोरमैलिटिज पूर्ण करा तुम्ही, असं सांगून डॉक्टर अतिदक्षता विभागात गेले.
थोड्या वेळाने जवळचे नातेवाईक, काहींचे फोन असं सगळं आपोआपच सुरू झाले. पुढच्या ४ दिवसांत बायपास सर्जरी करून घ्यावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगितले. पण त्याहुनही जास्त काळजी ही होती की तिच्या नवऱ्याने दडपण घेतल्याने बी. पी. बरेच वाढले होते. वेगवेगळ्या नळ्या, ऑक्सिजन, सलाईन, बरेच काय काय चालू होते व नवरा हताशपणे पडून होता. एक क्षण हिचे ही डोळे पाणावले पण लगेच दुसऱ्या क्षणी ती खंबीर झाली.
डॉक्टरांची परवानगी घेऊन त्यांना भेटायला ती आतमध्ये गेली. कसे वाटते आहे, डॉक्टरांनी काळजीचे काहीच नाहीये, असं मुद्दाम खोटेच सांगितलं. तुम्ही धीराने घ्या. आपल्या मुलांकरिता, तुमच्या आईं करता कणखर व्हा. मनात काही काळजी आणू नका. मी आहे ना, मी सारे काही बघते, फक्त तुम्ही हार मानू नका.. (शब्दांपेक्षा डोळ्यांनी खूप काही जास्त सांगितले होते..) तो मूकतेने तिच्याकडे पाहतच राहिला.
दुसऱ्या दिवशी बी.पी. बऱ्यापैकी खाली आले होते, त्यांचे शरीर व्यवस्थित साथ देत होते. खरेच, आपलं माणूस आपल्याबरोबर खंबीरपणे उभे आहे, हि भावना किती महत्त्वाची आहे. आपले मन हे एखाद्या बागे सारखं आहे, त्याच्यात काय फुलवायचे हे आपणच ठरवायचं.
नात्यांच्या चढ-उतारात नवरा बायकोने एकमेकांना भक्कम आधार देतच पुढे जायचे, बरोबर ना!! समाप्त!!
©® सौरभ पटवर्धन

ŞİMDİ OKUDUĞUN
नाती_जपतांना
Genel KurguThis is an attempt to write small stories about human relations and maintain relationships... These are based on true incidents, with updated names and some editions. It's my own creation, with an intention to pass a good social message. I am trying...