#नाती_जपतांना - कथा १३

4 0 0
                                    


त्या दोघी, सखी-निती, खरे तर अगदी लहानपणापासुनच्या शेजारी नि एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी.. वयाने ३ वर्षांचाच फरक, तरी निती नेहमीच ताई ताई करत सखीच्या मागे पुढे! दोघी मोठ्या होऊन लग्न होऊन एकाच शहरात एकाच घरी सख्ख्या जावा म्हणून आल्या, हा ही एक दैवी योगच..


तर अशा या दोघींचे स्वभाव मात्र एकदमच भिन्न होते, म्हणतात ना औपोसिट पोल ऍटर्रेक्टस्, तसे काहीसे.. सखी काहीशी शांत, सगळे विचारपूर्वक करणारी तर निती अत्यंत धांदरट. आले मनात, केले जोशात.. सखी प्रत्येक गोष्टीत नितीला सहभागी करून घ्यायची, तिचे चांगले वाईट सगळेच माहिती असल्याने तिला व्यवस्थित सांभाळून घ्यायची.. ताई आहे या भरवशावर निती ही नेहमीच निवांत... सगळे म्हणायचे नशिबवान आहेस बाई, अशी मैत्रीण व जाऊ तुझ्या पाठीशी आहे.


बघता बघता दोघीही पन्नाशी ओलांडून पुढे गेल्या, दोघींचे संसार व्यवस्थित मार्गी लागले... काही कारणाने आता सखीला विस्मरणाचा त्रास सुरू झाला... तो एवढा वाढला की वर्षभरात ती कोणाला म्हणजे अगदी कोणालाच ओळखेनाशी झाली, ओळख राहिली ती फक्त निती बरोबर..


आपल्या या मैत्रिणीची आता सगळी देखभाल, सेवा सुश्रुषा नितीने ताब्यात घेतली... वेळप्रसंगी मायेने आपल्या मोठ्या जावेची आईही झाली.. पुढची तब्बल १० वर्षे, सखीच्या शेवटच्या श्वासापर्यंत, निती अगदी तिची सावली होऊन राहिली.. नात्याची वीण जपतांना, दोघींनी एकमेकींवर अगदी भरभरून माया केली.. असे लहानपणापासून ते शेवटपर्यंत रक्ताचे नसुनही त्याही जवळचं कोणी मिळणे हे ही मोठे नशिबच.. समाप्त!! ©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाWhere stories live. Discover now