#नाती_जपतांना - कथा २४

2 1 0
                                    

कोण! चिनू का रे, थांब आलो हा.. अगं ए, दार उघड गं लवकर.... (वयाने थकलेले पण मनाने चिरतरुण आजोबा) आले रे आले रे, करत चिनू ची आज्जी लगबगीनं दार उघडायला धावली.


काय रे, कधीची वाट बघतोय आम्ही.. होतास कुठे, फोनही केला, पण तो ही घेतला नाहीस... काळजी वाटते रे चिन्या... (प्रेमानं ओथंबून वाहणारे आजीचे मन कध्धीच आटत नाही)


आरे, हो हो, आत तर येऊ दे... ढैंट ए ढैंड sss.....

हे घ्या, तुम्हाला आवडतो तसा क्रिमी क्रिएशन बेकरीचा मावा केक आणलाय... चला पटकन कट करा आणि मला पण द्या...


चिनू, अरे प्रत्येक वेळी काही ना काही खाऊ आणायचाच असतो का? आम्ही आता दोघेही लहान नाही... काय!!! तरी मला तुझे फार कौतुक वाटते, आमच्या आवडीचे बरोबर घेऊन येतोस नेहमी... मुख्य आम्हाला भेटायला येतोस, वेळात वेळ काढून, त्याहून काय पाहिजे आम्हाला अजून... (आजोबांचा स्वर हळवा झाला)


वाsss... (नाटकी ओरडण्याच्या सूरात) आता परत ते नाही बोलायचं... लहानपणी जे तुम्ही माझ्याकरता करायचात, तेच आता मी करतोय.. बस...‌ हे बोलता बोलता आजीने बशीत आणलेले दोन मऊ केकचे तुकडे मिश्किल चिन्मयने गट्टम् केले होते....‌

 (नात्यांची ओढ ती च आहे आजोबा-आजी नि नातवाच्या भेटीची, फक्त खाऊ आणणारे व्यक्ती बदलले).. समाप्त!!

©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाWhere stories live. Discover now