ती लाजते जेव्हा | पर्व ३ | श्वास माझा होशील का? - भाग 2

318 0 0
                                    



तिला काही कळण्याच्या अगोदरच त्याने आयुष्य ला त्या दरीत ढकलून दिले...

"आयुष्य श श श......" रुपाली ची किंचाळी निघाली....

रुपाली ला दरदरून घाम फुटलेला ... ती खूप घाबरलेली, श्वास चढलेला आणि काय करावे, काय नाही, काही कळत नव्हते ...

"रुप्स... काय झाले?? ठीक आहेस ना ..."

"आयुष!! " त्याला आपल्या बाजूला बघून रुपाली धक्क्यात होती... अचानक आनंद हि झाला... "आयुष तू ठीक आहेस... " ती त्याच्या चेहऱ्यावरून हाथ फिरवत त्याला अनुभवत म्हणाली आणि लगेच त्याला आलिंगन देते...

आयुष ला तिला काय झाले अचानक काही कळेना... "रुप्स .... अगं किती घाबरली आहेस... काय झालं? स्वप्न पाहिलंस काय?"

"स्वप्न?" रुपाली तो शब्द ऐकून घड्याळी कडे बघू लागली... ३ वाजलेले रात्रीचे... ती स्वतःशीच विचार करू लागली... "इतके वास्तव वादी स्वप्न होते?" तिचा श्वास अजून हि चढलेलाच होता... हृदयाचे ठोके हि वाढलेच, असं वाटलं जणू आयुष चा हाथ सुटला हातातून... आयुष तिला आपल्या कुशीत घेतो..

"काय झाले? ये इकडे.. कसले स्वप्न पाहिलेस... किती घाम फुटला आहे.." तिच्या कपाळावरून हात फिरवत तो म्हणाला... रुपाली लहान बाळा सारखी घाबरून त्याच्या कुशीत शिरते... त्याला कवटाळून झोपते. "आयुष... मी आत्ता... मला ना आत्ता... " ती काही बोलायचा प्रयत्न करत असते पण काही सुचत नव्हते...

"श श श... शांत झोप काही बोलू नकोस... " आयुष्य तिच्या केसातून हाथ फिरवत तिला झोपी घालत म्हणाला... रुपाली त्याला घट्ट बिलगून झोपलेली कधी तरी तिला परत झोप लागते.

काही क्षणांनी आयुष तिला बाजूला नीट झोपवायचा प्रयत्न करतो पण रुपालीनि त्याला इतकं घट्ट धरून ठेवले होते कि त्याला वाटते तिची झोप तुटायची म्हणून तो हि मग तसाच झोपी जातो तिला बिलगून.

तो झोपायचा प्रयत्न करतो तेव्हा रुपाली झोपेत बरळत असते... "मला सोडून नको जाऊस... "

आयुष तिच्या कपाळावरून हाथ फिरवत तिला म्हणतो... "मी कुठेच नाही जात आहे रुप्स.... इथेच आहे तुझ्यापाशी... आणि नेहमी राहीन... " तो तिच्या कपाळाचे चुंबन घेतो आणि तिला थोपटतो...

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Where stories live. Discover now