TLJ ४| श्वास माझा होशील का? | 42

33 0 0
                                    

आनंद मोठ्या मुश्किल मध्ये होता, आयुष नि त्याच्यासमोर एक नवीन समस्या उभी केली होती. तो आपल्या विचारांच्या तंद्रीत होता जेव्हा आयुष गाणं गुणगुणत समोर आला... आनंद ला असे बघून त्याला विचारतो, "दादा काय झालं?"

"काय झालं..!!! तुझा गळा दबावासा वाटतोय मला... दाबू..??"

"अरे पण मी तुझ्या समस्येवर समाधान देऊ शकतो ना... सांग तर काय झालं ?" आनंद नाराज होता त्याला झालेला सर्व प्रकार सांगतो, आयुष आता गालात हसत होता... "हे बघ... झालं का तुझं हसून, एक तर तुझ्या मुळे मी अडकलोय इथे आणि तूला हसायला येतंय!!"

"अरे तुझ्या वर नाही हसत आहे दादा... मला हसायला आलं कारण तू मिशी काढत नाहीस म्हणून वाहिनी चिडली आहे आणि मी मिशी काढली म्हणून रुपाली ला आवडलं नाही"

"काय?? रुपाली ला आवडलं नाही?"

"नाही ना... पण मी मनवले तिला... आता तुझ्या समस्येवर लक्ष देऊ... "

"तूला खरं मिशी ठेवायची आहे का कि बाबा ओरडतील म्हणून घाबरतोयेस... "

"मला काय.... आरोहीच्या समाधानासाठी काढेल हि, पण बाबा !! तूला माहित आहे ना त्यांना मिशी किती आवडते आणि तू तरी कशी काढलीस... "

"मी सांगेन ना... दाढी करतांना चुकून एका बाजूची निघाली मग काय करणार... काय दादा तू पण ना... "

"हो तू ते सांगशील पण मग मी काय सांगणार आता?" आनंद गंभीर विचार करत म्हणाला.

आयुष हि विचार करत होता आणि काही क्षणांतच त्याला भारी आयडिया सुचली... "दादा... मला एक सांग... जर बाबांनी पण मिशी काढली तर??"

"ए.. वेड लागलंय का तूला... बाबा आणि आपली मिशी काढणार...?? शक्यच नाही ह्या जन्मात तरी ते शक्य नाही... "

"अरे... तू बघ रे फक्त.. मी काढतो कि नाही बाबांची मिशी... "

"ए.. आयुष नको हा... मला माहित आहे तुझ्या डोक्यात ते रात्री लपून छपून जाऊन त्यांची मिशी काढणं असं काही असेल... नको नको... घरात लग्न कार्य आहे उगाच बाबांचा मूड नको जायला, त्यांना राग आला तर मग आपलं काही खरं नाही..."

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Where stories live. Discover now