मनगुज...
फ्रेंड्स,
आज हि कथा इथे संपत आहे, कथा संपत असली तरी ह्यातले सर्व पात्र तुमच्या मनात घोळत राहणार आहेत मला माहित आहे, त्यामुळे ते परत नक्की येतील तुम्हाला भेटायला, कारण मी हि नाही जगू शकत त्यांच्या शिवाय. आशा आहे कथा आवडली असेल.
ह्या कथेतून मला काही सांगायचे होते... मला एक प्रश्न पडला होता...
आपण हे जग सोडून गेल्यावर काय होतं? म्हणजे आपल्या प्रेमाचे काय होतं? आपण ज्या आपल्या प्रियजनांवर इतकं प्रेम करतो... त्यांच्या वर जीव ओवाळून टाकतो ते आपला श्वास थांबल्यावर सारं असं कसं संपून जातं?? नाही ना ते शक्य? जस आपण झुरतो त्यांच्या आठवणीत त्या व्यक्तीला ला हि ह्या जगात आपल्यासाठी जगत राहण्याची ओढ राहत असेल ना?? मग काय.,.. मी थोडं रिसर्च केला... आणि माझ्या आनंदाला पारा नाही राहिला जेव्हा मला हे कळले कि अशी एक थेरी आहे cellular memory थेअरी म्हणजे कि आपल्या आठवणी फक्त ब्रेन मध्ये राहतात असे नाही... तर असे बऱ्याच घटना समोर आल्या आहेत ज्यानी असे प्रमाणित करता येईल कि आपल्या बॉडी चे सेल आपल्या आठवणी साठवतात. हार्ट ट्रान्सप्लांट झालेले पेशंट, किडनी ट्रान्सप्लांट, त्यांना त्यांच्या डोनर च्या आठवणी किंवा कला गुण आत्मसाद झाल्या...
बस... आणि माझ्या डोक्यात ह्या कथेने जन्म घेतला...
फ्रेंड्स... आपण हे जग सोडून गेल्यावर पण ह्या जगात राहू शकतो..
आणि फक्त एवढेच नाही... ज्याच्या आयुष्यात आपण जाऊ त्याच्या प्रियजनांना हि आनंद देऊ शकतो..
म्हणजे बघा ... तुम्हाला सर्वांना ओंकार चे किती टेन्शन आले होते... त्याला काव्या चे हृदय मिळाले नसते तर किंजल चे काय झाले असते ना?? तिनी आपल्या जिवलगाला गमावले असते...
पण काव्या च्या एका निर्णयाने त्यांचे आयुष्य परत प्रेमाने भरले आहे... तिच्या ह्या निर्णयाला तिच्या घरच्यांनी पण साथ दिली...
मी ओंकार ला का निवडले ते हि सांगते... ओंकार किंजल च आयुष्य तुम्ही जवळून पाहिलं आहे आता... जर मी एखादा तिसरा व्यक्ती कोणी दाखवला असता इथे तुम्ही इतके कनेक्ट नसते झाले... म्हणून ओंकार ला आणलं...
आता टाईमफ्रेम चा थोडा गोंधळ होत असेल कोणाचा तर ते हि स्पष्ट करते...
काव्या गेली त्याच दरम्यान ओंकार चा ऍक्सीडेन्ट झाला... आणि त्या नंतर च्या काळात त्यानी आपली प्रेमकथा लिहिली... आठवते त्याची गोल लिस्ट....त्याच्या हृदयात म्हणजे काव्या चे हृदय ना आता... जी त्याची प्रेमकथा, आठवणी होत्या त्या त्याने लिहून त्यांचे पुस्तक प्रकाशित केले...
एक सांगू इच्छित आहे... मी जे बोलते ना त्या गोष्टीं मध्ये स्वतः बिलिव्ह करते मी तसं करते, वागते आणि म्हणून तुम्हाला करायला सांगते... मी स्वतः नेत्रदान केले आहेत ... तर प्लिज असं मला त्या हिरो हिरोईन सारखे अजिबात नका समजू जे काही प्रोमोशन साठी सांगतात मी फेअर अँड लव्हली वापरतो तुम्ही हि वापरा टाईपस ...
माझ्या ह्या कथेमुळे कोणा एकाच्या मनात जरी मी हा मेसेज देऊ शकली आणि अव्यव दाना बद्दल महत्व पटवून देऊन त्यांचे मन परिवर्तन करू शकले तर असे वाटेल जन्म सार्थक झाले...
आपल्या हातात मेल्यानंतर हि कोणाच्या आयुष्यात रंग भरण्याचा हा एक सुंदर उपाय आहे...
मेले तरी कीर्ती रूपात जगावे असे काही म्हणतात ... आशा आहे तुम्हाला हा विचार आवडला असेल...
तुम्हाला हि पटले तर नेत्रदान आणि अव्यय दान करा... रक्तदान करा.. . ज्याने एखाद्या दुसऱ्याचा जीव वाचवता येईल... आणि असे करून खरं आपण एक जीव नाही तर त्यांच्या प्रियजनांच्या हि आयुष्यात आनंद भरू...मग आवडली का हि कथा श्वास माझा होशील का? अभिप्राय नक्की कळवा..
✍️ निशिगंधा
VOUS LISEZ
ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?
Mystère / Thrillerप्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स जगावं त्या एका व्यक्ती साठी तिच्या आनंदासाठी, तिच्या असण्यासाठी तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं प्रत्येकासाठी... नवरा, कधी बायको कधी बाबा, कधी आई कधी ताई भावना मात्र एकच... कधी हसणार आहे...