TLJ ४| श्वास माझा होशील का? | 9

60 0 0
                                    

हैद्राबाद मध्ये...

आनंद आणि शिवानी कॉन्फरेन्स ला जात होते. शिवानी रस्तायत हि आपल्या लॅपटॉप वर काम करत होती. काही रिसर्च सुरु होता तिचा...

"शिवानी तुम्ही खूप मनाला लावून घेतलं आहे... मी बघतोय, रात्र रात्र जागून काढताय ह्या प्रोजेक्ट साठी, पण तुमची तब्येत हि तेव्हढीच महत्वाची आहे... "

शिवानी त्याच्या कडे बघत हि नाही... "हो आनंद... हा प्रोजेक्ट आपल्या कंपनी साठी खूप महत्वाचा आहे... हि डील आपल्याला मिळालीच पाहिजे... "

आनंद मान हलवत म्हणला... "शिवानी तुम्ही काळजी नका करू... जे मॉडेल तुम्ही डिजाईन केलं आहे ना त्याला तोड नाही... मला खात्री आहे हि डील आपल्यालाच मिळेल... "

"आनंद ती तर मला हि खात्री आहे... मी पुढचा रिसर्च करत आहे, आज त्यांच्या सोबत डील साइन होताच त्यांना आपण पुढचा प्लॅन समजावून सांगू... कसं टप्या टप्यात आपण काम आटोपणार आहोत ते समजावून सांगू... " आनंद शिवानी कडे बघतच राहिला... किती पुढचा विचार करत होती ती. तिच्या आत्मविश्वासावर आज त्याला हि गर्व वाटू लागला...

ते दोघे कॉन्फरेन्स ला पोचतात.. आज त्यांच्या त्या जर्मन क्लायंट नि भारतात घेतलेल्या सर्व कंपनीच्या आढाव्यावरून ते ठरवणार होते कोणत्या कंपनी सोबत ते डील करणार... रोबोमाईंड सोबत अजून २ कंपन्या होत्या. अर्टिफहीशिअल इंटीलिजन्स मध्ये अजून जास्ती कंपन्यांनी हाथ रोवले नव्हते...

तिथे बाकीच्या लोकांशी हसून मिसळून बोलतात आनंद आणि शिवानी, जरी एक दुसऱ्याचे रायवल असले तरी कधी कोणती अडचण आली तर तेच राहणार होते एकमेकांच्या सोबतीला ह्याची जाणीव हि आनंद शिवानी ला होती. सगळ्यांची एकमेकांशी ओळख होते, चहा नास्ता होतो आणि कॉन्फरेन्स ची वेळ होते.

फेड्रिक आपल्या टीम ला घेऊन येतो. सर्व आप आपल्या स्थानी स्थानापन्न होतात. तसं फेड्रिक सगळ्यांचे आभार मानायला सुरु होतो, त्याला इंग्रजी नीट येत नसल्याने तिथे एक ट्रान्सलेटर असतो जो त्याच जर्मन मधलं बोलणं इंग्रजीत ट्रान्सलटे करून सर्वाना समजेल असे सांगत असतो...

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Место, где живут истории. Откройте их для себя