पायावरून मोरपीस फिरवल्यावर होणाऱ्या संवेदनांनी रुपाली शहारून गेलेली ... जसा जसा हाथ वर फिरू लागला हळू हळू त्या संवेदना हि वाढू लागल्या... तिच्यावर होणाऱ्या त्या प्रेमाच्या वर्षावात ती ओली चिंब भिजून गेलेली. जसा त्याचा हाथ तिच्या कमरेवरून पोटाकडे वळला तसं सर्रर्रर्रर्र कण तिच्या अंगावर काटा आला.... तिचा श्वास चढू लागलेला, त्याने जसा तिचा पदर बाजूला केला तिच्या छातीत धडधडायला लागले...
तिच्या कानात तो म्हणाला... "रुपाली मला तू खूप आवडतेस... !! माझी होशील का...??"
ते ऐकूण रुपाली स्वतःशीच हसते... लाजते... "अजून किती तुझी व्हायची राहिली आहे रे... "
असे म्हणत ती त्याचा चेहरा हातात घेते आणि त्याच्या ओठावर ओठ टेकवणार तेच तिची नजर त्याच्याशी मिळते... तेच डोळे ... रुपाली दचकून त्याला मागे ढकलते... आणि घाबरून उठून बसते...
आज हि तिला दरदरून घाम फुटलेला... हे असे स्वप्न?? कोण होता तो? तिला प्रश्न पडत होते, ती पूर्ण आतून हलून गेली होती. इतकं वास्तववादी स्वप्न होतं, ह्यावर विश्वासच बसेना... पण एकीकडे स्वप्न होतं म्हणून कुठे तरी मनाला बरं सुद्धा वाटत होतं. वास्तवात ती असं काही करेल किंवा तिच्या हातून घडले तर ती स्वतःला कधी माफ करू नाही शकणार, आयुष सोबत दगा करायचा ती विचार हि मनात नव्हती आणू शकत मग हे असलं स्वप्न पडण्याचा काय अर्थ? विचारात असतांनाच ती बाजूला बघते तर आयुष नव्हता... घड्याळ पहिले तर रात्रीचे ३ वाजलेले...
"३!! वाजले... आयुष कुठे आहे?" तिच्या मनात प्रश्न आला... ती उठून त्याला बघू लागली, पण आयुष कुठेही दिसेना... त्याची ऑफिस ची बॅग हि नव्हती. आपल्याला फारच गाढ झोप लागलेली ह्याची जाणीव तिला होते
आणि काही विचार करण्याच्या आत तिच्या हातांनी आयुष ला फोन लावला होता... पण फोन वाजत असून हि कोणी उचलत नव्हते. ती २-३ दा लावते. हळू हळू काळजी वाटू लागते. काय करायचे तिला काही समजत नाही. आनंद ला सांगावे म्हणून ती जाते...
YOU ARE READING
ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?
Mystery / Thrillerप्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स जगावं त्या एका व्यक्ती साठी तिच्या आनंदासाठी, तिच्या असण्यासाठी तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं प्रत्येकासाठी... नवरा, कधी बायको कधी बाबा, कधी आई कधी ताई भावना मात्र एकच... कधी हसणार आहे...