TLJ ४| श्वास माझा होशील का? | ४३

36 0 0
                                    


लग्नाचा दिवस उजाडला...

किंजल नि शलाका ला छान तयार केले होते, "आई, तुम्ही किती सुंदर दिसताय... तुम्हाला माझीच दृष्ट लागेल वाटतंय" किंजल आपल्या डोळ्यातलं काजळ त्यांच्या कानामागे लावत म्हणाली.

त्या तिचा हाथ आपल्या हातात घेत म्हणाल्या, "तू आहेस सोबत म्हणून मला श्वेताची कमी जाणवत नाही आहे... " बोलता बोलता त्यांचे डोळे थोडे पाणावले..

"आई... " किंजल त्यांच्या समोर गुडघ्यांवर बसत म्हणाली, "ताईंना कसं जमणार तुम्ही सांगा, नाही ना ते शक्य.. " त्या फक्त मान हलवतात. "तुम्ही मला सांगा ना... म्हणजे मी प्रेमळ मुलगी आणि खट्याळ सून असे दोन्ही रोल दाखवेल तुम्हाला... " किंजल डोळे मिचकावत म्हणाली तसे शलाका हसल्या.

"चल जा पळ... सध्या तर चंचल किंजल ला छान तयार झालेली बघायची इच्छा आहे माझी..." किंजल मान हलवत हो म्हणते आणि तयार व्ह्याला निघते.

किंजल आपल्या खोली जवळ पोचते तशी तिला ओंकार गाठतो... तिला रूम मध्ये घेत ओंकार दार लावून घेतो... "ओंकार... अरे काय करतोस... " किंजल दाराची कडी काढत म्हणते...

ओंकार परत काडी लावतो आणि म्हणतो... "२ मिनिट प्लिज... मला काही सांगायचं आहे तुला... " असे म्हणत तो तिला पलंगावर बसवतो आणि तिचा पाय हातात घेतो किंजल ला तो काय करतोय ते काहीच कळत नाही, "ओंकार... काय करतोस... " ओंकार फक्त एक नजर तिच्या कडे बघतो आणि मग आपल्या जॅकेट च्या खिशातून काही काढतो आणि तिच्या पायात पैंजण घालतो.किंजल त्या नाजूक सुंदर पैंजण बघून खुश होते, "ओंकार... कधी आणल्यास?"

"आवडल्या?"

"हो खूप सुंदर आहेत... "

ओंकार दुसऱ्या पायात हि पैंजण घालतो आणि मग म्हणतो... "काही हि... आता तुझ्या पायांनी त्यांचे सौंदर्य वाढवले आहे... " किंजल नजर झुकवते, उरातून आनंद ओसंडत होता, आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्न करत होती, ती नजर उचलून ओंकार कडे बघते, त्यानी समोर अजून काही गोष्टी ठेवल्या होत्या. आणि मग आपल्या जॅकेट मधून तो काही हळुवार पणे काढत होता, किंजल आता कुठे त्याला नीट लक्ष देऊन बघत होती, त्या ब्लॅक जॅकेट मध्ये, क्लीन शेव करून ओंकार तिला घायाळ करत होता, तिच्या मनात तर आता त्याला जवळ घेऊन त्याचे लाड करावेसे वाटत होते, पण हा काय करतोय म्हणून ती कुतूहलाने बघते, ओंकार एक गुलाबाचे फुल काढतो आणि उभा होतो, किंजल ला काय चालले कळत नव्हते पण जे हि होते ती खुश होती...

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Donde viven las historias. Descúbrelo ahora