TLJ ४| श्वास माझा होशील का? | ४०

23 0 0
                                    



ओंकार आणि किंजल ठरल्याप्रमाणे आई ला मानवण्या साठी गावी गेले, त्यांना अचानक असे घरी आलेले बघून काय करू आणि काय नाही असे झाले त्यात किंजल ची घरी येण्याची पहिली वेळ...

ओंकार जसा आत येऊ लागला त्या त्याला थांब असे म्हणतात... ."अरे थांब १ मिनिट... एक तर काही सांगायचं नाही ... थांब इथेच थांब , थांब मी आले... " म्हणत घाई घाईत त्या आत गेल्या.

किंजल ओंकार कडे काय झाले असे बघते, तो हि काय माहित म्हणतो. तेवढ्या त्या आरती च ताट घेऊन आल्या, "अरे, पहिल्यांदाच किंजल घरी आली आहे" त्यांच्यावरून पोळी ओवाळून टाकत त्या दोघांना ओवाळून आत घेतात.

त्यांच्या सोबत काही सामान नाही बघून त्या नाराज होत म्हणतात, "या वेळेस हि असाच आलास ना २ दिवसाचा?"

"आई.. ." ओंकार त्यांना बिलगत म्हणतो, "आलो ना... तूला भेटायला... ते दिल सोडून, लगेच किती दिवस राहणार हेच सुरु... आणि बघ ह्या वेळेस किंजल ला हि तूला भेटायला घेऊन आलो ... "

"हो का... तू घेऊन आलास का तिला सोबत?" ओंकार डोळे मोठे करून हो असे बघतो ... "मला माहित आहे हा कोण कोणाला घेऊन आलं ते, तू मला नको शिकवू"

किंजल गालात हसत असते त्यांचे हे बोलणे ऐकून.

"जा आतमध्ये आणि फ्रेश व्हा मी तुझे आवडते पोहे करते... नाही नको, आज किंजल ला काय आवडते ते बनवते, काय आवडते बेटा तूला? काय खाणार?"

किंजल ला काय उत्तर द्यावे तेच कळत नव्हते, "मला सर्व आवडते आई, तुमच्या हातचे काही हि चालेल... मला आवडतील पोहे, पोहेच करा" ती चोरून ओंकार कडे बघते...

पूर्ण वेळ ओंकार किंजल ची खुसपूस सुरु होती, काय करायचे? आई समोर विषय कसा काढायचा...? सकाळी नाष्ट्या च्या वेळी शलाकाजींना ते जाणवले होते, जेवतांना सुद्धा त्या दोघांच्या खाण खुणा चालू होत्या, किंजल ओंकार ला तू विषय काढ म्हणत होती आणि तो तिला तू सुरु कर म्हणत होता शेवटी न राहून शलाका त्यांना म्हणतात, "ओंकार घरी आला आहेस तर माझ्याशी बोल... किंजल आहेच तुझ्याशी बोलायला..." त्यांचे वाक्य ऐकून किंजल कावरी बावरी होते, ती ओंकार कडे रागाने बघते... पण ओंकार कुठे तिच्या कडे बघू शकणार होता, तो आपला घसा साफ करत म्हणतो, "ते आई... आम्ही तुझ्या बद्दलच बोलत होतो... ते किंजल नि तुझ्या साठी सरप्राईज आणले आहे ते देऊ का विचारत होती... " किंजल अजून गोंधळते कारण ओंकार काय बोलतोय तिला कळत नव्हते. कसले सरप्राईज... ?? ती स्वतःशी विचार करते.

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Where stories live. Discover now