आयुष ला काय घडतंय डोळ्यांसमोर कळेना... हा पुतळा एक्दम जिवंत झाला...
"आयुष !! आयुष माझा हाथ... " रुपाली कळवळत होती, धडपडत होती त्या पुतळ्याच्या हातातून आपला हाथ सोडवण्यासाठी...
आयुष धावत तिच्या पाशी जातो आणि तिचा हाथ त्या पुतळ्याच्या हातातून काढायचा प्रयत्न करतो....
"आयुष... मला खूप भीती वाटतं आहे... " तिथे अचानक इतकी गर्दी होती आणि आता कोणीच नव्हते...
"तुम्ही वेळ वाया घालवता... " आयुष च्या खांद्यावर एक थाप पडली आणि आयुष वर बघतो तर तो पुतळा त्याला सांगत होता... "हि माझी सोल मेट आहे, मी हिची वाट कितीतरी वर्षांपासून बघत आहे... "
"ए... वेडा आहेस का?? बायको आहे ती माझी... " आयुष त्याच्या कडे लक्ष न देत रुपाली चा हात त्याच्या हातून सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाला...
"प्लिज सर, मला माझ्या कलागुणांचा उपयोग करायला नका लावू... " तो दुसऱ्या हाताने आपल्या तलवारीला हाथ लावत म्हणाला... ते बघून आयुष घाबरून रुपाली कडे बघतो... अंधार हि बराच पडला होता ... आयुष पूर्ण जोर लावून रुपाली चा हाथ सोडवतो आणि त्या पुतळ्याला धक्का देतो, त्याने तो पाण्यात पडतो.
"रुप्स पळ.. !!!" आयुष रुपाली ला ओरडतो आणि तिचा हाथ धरून तिथून पाळणार पण समोर मोठे लाईट्स बघून डोळे दिपवतात, ती दोघे तिथेच थांबतात. त्यांच्या समोर एक व्यक्ती येते आणि लाईट चा प्रकाश हि कमी होतो...
"मग.. थ्रिल कसं वाटलं आयुष सर?" आयुष गोंधळला होता ह्यांना माझं नाव कसं माहित...
"आपण ओळखाल नसेल मला मी डॅनियल... तुम्ही माझ्या शीच बुकिंग संधर्बात बोललात... " आयुष ला त्याच नाव लक्षात येते..
"ओह हा.. हो हो... अहो पण मला ना सध्या इथून निघायचे आहे मी नंतर बोलतो... " आयुष एवढे बोलतो आणि मागे बघतो तर तो प्रिन्स पाण्यात भिजलेला वर आलेला असतो पाण्यातून... त्याला बघून आयुष परत घाबरतो... "रुप्स चल लवकर... "
डॅनियल त्यांना थांबवतो... आणि त्या प्रिन्स ला जाण्यास सांगतो, त्याचा इशारा बघून तो जातो हि... आयुष डॅनियल कडे कधी तर कधी त्या जाणाऱ्या प्रिन्स कडे बघत होता, "सर मला कळेल का काय होतंय इथे... आणि हा पुतळा तुमचं कसं काय ऐकतोय?"
YOU ARE READING
ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?
Mystery / Thrillerप्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स जगावं त्या एका व्यक्ती साठी तिच्या आनंदासाठी, तिच्या असण्यासाठी तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं प्रत्येकासाठी... नवरा, कधी बायको कधी बाबा, कधी आई कधी ताई भावना मात्र एकच... कधी हसणार आहे...