शिवानी रुपाली शी बराच वेळ बोलून मग स्वतःचे आवरायला जाते... रुपाली परत पुस्तकात रमते...
ऋचा आणि कावेरी ची होणारी जवळीक वाचतांना तर जणू कोणी तिचेच हृदय उघडून समोर ठेवले होते... त्यात वर्णन केलेला ऐकून एक शब्द तिच्या मनाला स्पर्शवुन गेला...
वाचता वाचता रुपाली आपल्या आठवणीत बुडाली... तो दिवस काही वेगळाच होता, काव्या ला डान्स साठी खास आकर्षण होते. दोघी रूम मध्ये बसून पेपर चाळत बसल्या होत्या... दिवस बाकी दिवसांसारखाच होता सर्व त्या क्षणी बदलले.... जेव्हा रेडिओ वर ताल चे बिट वाजायला सुरु झाले आणि काव्या चे पाय थिरकू लागले...
'दिल ये बेचैन हॆ... रस्ते पे नैन है .... ताल से ताल मिलओ... '
ते बघून रुपाली नि आवाज वाढवला... घरी बाकी कोणी नव्हते... रुपाली नि काव्या ला डान्स कर म्हणून इशारा केला... काव्या स्वतः तर उठलीच पण आपल्या सोबत तिने रुपाली ला हि ओढले... दोघीनी मन सोक्त डान्स केलेला...
'ताल से ताल मिला... हो... सावन ने आज तो मुझको भिगो दिया.... हाय मेरी लाज ने मुझको डूबा दिया... कुछ मैने खो दिया... क्या मैने खो दिया.... ताल से ताल मिला...'
सर्व आठवूनच रुपाली चा श्वास चढलेला... बेधुंद, पहिल्यांदाच तिनी इतका डान्स केलेला आणि काव्या तर तुफान होती. तिचा तो निरागसपणा जणू रुपाली च्या मनाला भावून गेलेला...
तीच ते निर्मळ झऱ्यासारखं खळखळणं... सर्व आठवून रुपाली चे डोळे पाणावले... तिने ते पुस्तक हृदयाशी लावून घेतलं... तिच्या काव्या चा जणू त्यात अंश होता. ज्यानी लिहिले कसे लिहिले... आता हे म्हणत्वाचे राहिले नव्हते तिच्या साठी... कोणी होते ज्याने तिला ते क्षण परत जगवले होते. कोणी होते तिच्या व्यतिरिक्त ज्याला त्या क्षणाची तितकीच आत्मीयता होती, तितकेच महत्व होते... तितकेच उराशी जपले होते... तिला होणाऱ्या मनातल्या भावना त्याने अगदी बरोबर हेरला होत्या. तिचे नि काव्या चे नाते कोणी समजले होते.
न कळतच रुपाली चे मन रडत होते...
तेरे जाणे का गम और ना आणे का गम फिर जमाने का गम
KAMU SEDANG MEMBACA
ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?
Misteri / Thrillerप्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स जगावं त्या एका व्यक्ती साठी तिच्या आनंदासाठी, तिच्या असण्यासाठी तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं प्रत्येकासाठी... नवरा, कधी बायको कधी बाबा, कधी आई कधी ताई भावना मात्र एकच... कधी हसणार आहे...