TLJ ४| श्वास माझा होशील का? | २२

23 0 0
                                    


आयुष आणि रुपाली थकून हॉटेल वर परत पोचले, आयुष थकून सोफ्यावर बसतो, "हुश!! आज किती काम केले असे वाटत आहे.. मला आज कळतंय यार डोकं चालवून पण किती थकवा येतो... दादा दिवस भर डोक्याचे काम करतो ऑफिस मध्ये आणि म्हणूनच थकतो यार... आज तर मी जरा जास्तीच वापर केला आहे माझ्या डोक्याचा... थकलो आहे... जरा छान शॉवर होऊन येतो... " असे म्हणत आयुष जातो. रुपाली तो गेल्यावर आपल्या हॅन्डबॅग मधून मोबाईल काढायला जाते, क्यू शी बोलायचे होते. हॅन्डबॅग उघडते तर तिनी आयुष साठी घेतलेले गिफ्ट दिसते... ते बघून तिच्या चेहऱ्यावर हसू येते. ती बाहेर काढून बेड वर ठेवते. आपल्या फोन वर काय मेसेज आलेत ते बघत बसते... काही वेळाने आयुष फ्रेश होऊन येतो. टॉवेल नि डोकं पुसत असतो, रुपाली फ्रेश व्हायला जाते आणि जाता जाता त्याच्या कडे बघत म्हणते... "बेडवर तुझ्यासाठी गंमत ठेवली आहे... आवडते का बघ... " डोळे मिचकावत ती दार लावून घेते...

आयुष बेडवर बघतो तर एक कत्थ्या रंगाची कागदी बॅग ठेवलेली दिसते... उत्सुकतेने तो बॅग उघडतो...

"रुप्स!! तू हे माझ्या साठी घेतलस? कधी... ?? केव्हा गेली होतीस.. ." आयुष ती बॅग हातात घेत म्हणला, तो उघडून बघतो तर त्यात त्याच्या आवडत्या शेणई ब्रँड चा टी-शर्ट होता. आयुष ला इतका आनंद झालेला तो लगबगीने उघडतो...

रुपाली आतून आवाज देते... "आवडला का?"

"आवडला ... ?? हा काही प्रश्न झाला का... तुला कसं लक्षात राहत यार... आणि रंग किती युनिक आहे... थँक यु रुप्स... " आयुष त्याचे सर्व लेबल पटपट काढतो आणि ट्राय करायला घेतो....

रुपाली स्वतःशीच आत हसत होती कि त्याला आवडले. काही वेळाने रुपाली फ्रेश होऊन येते, तिनी सफेगेटी घातली होती आणि बाहेर आल्यावर आयुष कडे बघते... तो कोपऱ्यात उदास बसून होता, आता २ क्षण पूर्वी इतका आंनदी होता आणि आता काय झालं म्हणून ती त्याच्या जवळ जाऊन बघते... "काय झालं?"

आयुष तिनी दिलेलं टी-शर्ट घालून होता, एक्ससाईटेड इतका होता तेव्हा कि त्याच्या हे हि लक्षात नव्हते कि त्याने खाली पॅन्ट घातली नाही आहे, बाथरोब काढून लगेच टी-शर्ट ट्राय करायला घेतला होता. रुपाली त्याला बघून गालात हसते... पण त्याला असे उदास बघून स्वतःचे हसू आवारात त्याला म्हणते "अरे सांगशील का? काय झालं?"

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Donde viven las historias. Descúbrelo ahora