TLJ ४| श्वास माझा होशील का? | ३१

17 0 0
                                    


तिकडे अनंत च्या खोलीत.....

अनंत आणि अंकिता आज खूप खुश होते.

"आज आयुष रुपाली ला बघून माझ्या मनाला खूप शांती मिळाली बघा... "

"हम्म.. अगदी बरोबर बोललीस... मला वाटलेलं आता हे लंडन वरून काय नवीन प्रकार उघडकीस येतो, पण सर्व सुरळीत झालं, आयुष च आयुष्य मार्गी लागलं आता... "

"हो... अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही, रुपाली नि खूप सुंदर रित्या सर्व निस्तरलंय आणि आयुष, क्यू ला हि सांभाळले आहे ना हो" अंकिता एक सुस्कारा सोडत म्हणाल्या.

अनंत अंकिता ला बरोबर म्हणालीस असे बघतात.

"पण काय हो तुम्ही आयुष ला उगाच आज नसती ती प्रश्न विचारून अस्वस्त का केलेत?"

अनंत गालात हसत म्हणाले, "अगं मी तर विसरलोच, त्याला प्रश्न विचारले आणि त्रास तुला झाला... माफ करा सरकार... तुमच्या लाडक्या सुपुत्राला मी त्रास दिला.. " अनंत कान धरत म्हणले...

"अहो... माफी काय..??"

"अगं ते बघ, आयुष अजून हि इतका निरागस आहे ना, त्याला छेडायला आवडते, आणि तू बघितलेस का आयुष ला प्रश्न विचारले आणि तो निरुत्तर झाला कि रुपाली कशी त्याच्या बाजूनी उत्तर देत होती... तेच आवडत होते म्हणून आयुष ला सोडावेसेच वाटत नव्हते, त्यांच्यातला समंजसपणा" आनंद आणि अंकिता दोघे हसतात.

बराच वेळ ते गप्पा मारत बसतात.

रात्र बरीच झाली होती, अनंत चा डोळा लागू लागतो, "झोप आता, तुला झोप नाहीं का येत आहे...?"

"नाहीं... ना आज इतक्या दिवसांनी आपण सर्व एकत्र होतो, इतका आनंद होता ना ह्या गोकुळात माझ्या, मला हा दिवस संपूच नाहीं असे वाटत आहे... "

"हम्म... " म्हणत अनंत अर्ध झोपेत गेले होते.

~.~.~.~

दारावर कोणी कनॉक करते म्हणून आनंद चिडून बघायला उठतो... "हा आयुष मला कधी निवांत झोपू हि देईल हि नाही काय माहित देवा... " स्वतःशी पुटपुटत तो दार उघडतो...

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Where stories live. Discover now